Join us

अरे वाह! दादासाहेब फाळकेंची भूमिका साकारणार साउथमधील 'हा' सुपरस्टार, राजामौली करणार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:50 IST

भारतीय सिनेसृष्टीचे जनक अशी ओळख असणारे दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर सिनेमा येत असून भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे

भारतीय सिनेमाची मुहुर्तमेढ रोवणारे मराठमोळे आणि भारतीय सिनेसृष्टीचे जनक अशी ओळख असणारे दादासाहेब फाळके. सर्व सिनेप्रेमींसाठी आणि खासकरुन मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर सिनेमा येत असून बाहुबली आणि RRR सिनेमांचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली हा मोठा प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता या सिनेमात दादासाहेब फाळकेंची भूमिका साकारणार आहे.

हा अभिनेता साकारणार दादासाहेब फाळकेंची भूमिका

'मेड इन इंडिया' नावाच्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेता ज्यु. एनटीआर दादासाहेब फाळकेंची भूमिका साकारणार आहे.  हा एक पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. भारतीय सिनेमांचा सुरुवातीच्या काळात कसा विकास झाला आणि दादासाहेब फाळकेंनी भारतीय सिनेमाची मुहुर्तमेढ कशी रोवली, याची खास कहाणी 'मेड इन इंडिया' सिनेमात दिसणार आहे. २०२३ मध्येच राजामौलींनी या प्रोजेक्टची घोषणा केली होती. आता लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

वरुण गुप्ता (मॅक्स स्टूडियोज) आणि एस.एस. कार्तिकेय (शोइंग बिजनेस) यांच्यातर्फे या सिनेमाची निर्मिती होणार आहे. २०२३ पासून या सिनेमावर काम करण्यात येत असून नुकतीच या सिनेमाची फायनल स्क्रीप्ट लॉक करण्यात आली आहे. जेव्हा ही स्क्रीप्ट ज्यु. एनटीआरला ऐकवली तेव्हा तो या सिनेमात काम करायला लगेच तयार झाला. अॅक्शन सिनेमांपासून काहीसं दूर राहून ज्यु, एनटीआरला काहीतरी वेगळं करण्याची संधी या सिनेमातून मिळणार आहे. राजामौली या सिनेमाचं दिग्दर्शन करणार का? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरएस.एस. राजमौलीबॉलिवूड