Join us

...पुन्हा एकदा एकत्र काम करण्याचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 17:38 IST

‘बी टाऊन’ मधील सलमान खान आणि कॅटरिना कैफ हे कपल प्रचंड चर्चेत असते. आता त्यांचा ब्रेक-अप झाला असला तरीही ...

‘बी टाऊन’ मधील सलमान खान आणि कॅटरिना कैफ हे कपल प्रचंड चर्चेत असते. आता त्यांचा ब्रेक-अप झाला असला तरीही त्यांचे वैयक्तिक आयुष्य हे तसे चर्चेतच आहे. कॅटरिना रणबीर कपूरसोबत आणि सलमान खान हा युलिया वेंटरसोबत चर्चेत असते.मात्र, आता ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी ते एकत्र येणार आहेत. त्याबद्दल बोलतांना कॅटरिना म्हणते की,‘सलमानसोबत तब्बल चार वर्षांनंतर मी काम करणार आहे, याचा मला प्रचंड आनंद होत आहे.ते ‘टायगर जिंदा हैं’ चित्रपटात आता एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट आम्हा दोघांसाठीही फार महत्त्वाचा आहे. आम्ही दोघेही चित्रपटाच्या सेटवर एकमेकांसोबत फार जास्त कम्फर्टेबल होतो. पण पुन्हा आम्ही एकत्र आलोय याचा मला आनंद आहे.