Join us

‘फोर्स २’ ट्रेलरमध्ये जॉन-सोनाक्षीचा प्रभावी लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:17 IST

‘फोर्स’ चित्रपटात जॉन अब्राहम आणि जेनेलिया डिसूझा हे मुख्य भूमिकेत होते. मात्र, आता लवकरच जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा ...

‘फोर्स’ चित्रपटात जॉन अब्राहम आणि जेनेलिया डिसूझा हे मुख्य भूमिकेत होते. मात्र, आता लवकरच जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांचा ‘फोर्स २’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे.यात जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा, ताहिर राज भसिन हे असतील. दहशतवादी आणि रॉ एजंट यांच्यातील चकमकीचे कथानक यात चित्रीत करण्यात आले आहे. अ‍ॅक्शन, पॉवर पॅक्ड आणि थ्रिलर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. अभिनय देव दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित हा चित्रपट आहे.