‘जॉली एलएलबी’चा वाद पोहोचला कोर्टात; ३ फेब्रुवारीला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 20:47 IST
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी २’ रिल लाईफच्या कोर्टातून रिअल कोर्टात पोहचला आहे. ‘जॉली एलएलबी-२’ या ...
‘जॉली एलएलबी’चा वाद पोहोचला कोर्टात; ३ फेब्रुवारीला होणार सुनावणी
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी २’ रिल लाईफच्या कोर्टातून रिअल कोर्टात पोहचला आहे. ‘जॉली एलएलबी-२’ या चित्रपटाविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटातून वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची थट्टा करण्यात आल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांनी नोंदविला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला असून यावर ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. अॅड. अजयकुमार वाघमारे, अॅड. पंडितराव आनेराव यांनी ‘जॉली एलएलबी २’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायाधीशाच्या डायसवर धावून जातात, न्यायाधीशांसमोर हाणामारी आणि बीभत्स नृत्यही करतात, असे दाखविण्यात आले आहे. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असं लिहून निर्माता आणि दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची आणि वकिली व्यवसायाची थट्टा केली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. Read More : अक्षय कुमार-रजनीकांतचा मास्टर प्लॉन तयार सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती जे.एस. खेहर, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एन.वी. रामना यांनी निर्मात्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे. यावर आता ३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. निर्मात्यांची बाजू मांडताना वकील अभिषेक मनू संघवी यांनी या चित्रपटाला सेंसॉर बोर्डाने पास केले आहे असा युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. जे. दीक्षित, आर. एम. धोर्डे आणि डॉ. कानडे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीने सिनेमा पाहून ३ फेब्रुवारी रोजी अहवाल देणार असल्याचे सांगितले. Read More : कधी जीभ तर कधी चॉकलेट दाखवून मीडियावर भडकली अक्षय कुमारची चिमुकलीअक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेला जॉली एलएलबी २ हा चित्रपट १० फेब्रुवारीला रिलीज केला जाणार असून सेंसॉर बोर्डाने या चित्रपटाला ए/यू सर्टीफिकेट दिले आहे. औरंगाबाद खंडपीठात याचिकाकर्त्यांनी माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव, केंद्रीय विधी आणि न्याय सचिव, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, फॉक्स स्टार इंडिया स्टुडिओ, चित्रपटाचे निर्माता, लेखक सुभाष कपूर, अभिनेता अक्षयकुमार, अन्नू कपूर, राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे सचिव, विधी आणि न्याय विभाग यांना प्रतिवादी केले आहे. ALSO READ अभिनेत्यांनाही येड लागलेय राजकारणाचेअक्षय कुमार म्हणतो संघर्ष चित्रपटाने माझ्यात अभिनेता म्हणून अनेक बद्दल केले