Join us
Daily Top 2Weekly Top 5

 प्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 20:43 IST

बॉलिवूडमध्ये एखादा खास इव्हेंट झाला आणि नेटकऱ्यांनी त्यावर मीम्स बनवले नाहीत, हे शक्यचं नाहीत. यावेळी नेटक-यांच्या निशाण्यावर आलेत ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची ‘रोका सेरेमनी’.

बॉलिवूडमध्ये एखादा खास इव्हेंट झाला आणि नेटकऱ्यांनी त्यावर मीम्स बनवले नाहीत, हे शक्यचं नाहीत. यावेळी नेटक-यांच्या निशाण्यावर आलेत ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची ‘रोका सेरेमनी’. होय, प्रियांका व निकने आपले रिलेशनशिप अधिकृतरित्या जाहिर केले. यानंतर संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण सोबतचं इंटरनेट जनरेशनने त्यांच्यावर एकापेक्षा एक जोक्स तयार करत, ते व्हायरल केलेत.

प्रियांका व निकच्या रोका सेरेमनीच्या एका फोटोत अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’मधील लूकचा वापर करण्यात आला. हा फोटो पाहून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

रोका सेरेमनीत निक जोनास पारंपरिक वेशभूषेत दिसला. यावरूनही त्याची मजा घेण्यात आली.

निक जोनासच्या तोंडी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील एक लोकप्रीय डायलॉग टाकून नेटक-यांनी एक कल्पक मीम्स बनवला. ‘वो इंडियन लडकी के शादी किया तो बारात में नागिन डान्स करना जरूरी है क्या?’ असे निक विचारतोय, असे यात दाखवले गेले.

एका फोटोत प्रियांका व निकच्या हातात पूजेचे साहित्य आहे. पण नेटक*यांनी याजागी त्यांच्या हातात पाणीपुरी दिली. ‘जो कपल साथ मे गोलगप्पा खाते हैं, वह हमेशा साथ रहते हैं,’ असे यासोबत लिहिले.

केवळ भारतीय नेटक-यांनीच नाही तर विदेशी चाहत्यांनीही प्रियांका व निकच्या रोका सेरेमनीनंतर काहीशा अशा मजेशीर प्रतिक्रिया शेअर केल्यात.

टॅग्स :प्रियंका चोप्रा