Join us

"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:01 IST

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'हेरा फेरी ३'मधून परेश रावल यांनी एक्झिट घेतल्यामुळे चाहते नाराज आहेत. परेश रावल यांच्या एक्झिटनंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. तर परेशल रावल यांना 'हेरा फेरी ३'मध्ये पंकज त्रिपाठी रिप्लेस करणार असल्याचंही बोललं जात होतं. परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

परेश रावल नसतील तर मजा येणार नाही, असं जॉनी लिव्हर यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी परेश रावल यांना सल्लाही दिला आहे. "मला वाटतं की त्यांनी सिनेमात काम केलं पाहिजे. या गोष्टी एकमेकांशी चर्चा करून सोडवल्या पाहिजेत. मॅटर सोडवला पाहिजे कारण चाहते त्यांना सिनेमात त्यांना मिस करतील. त्यांच्याशिवाय सिनेमात मजा येणार नाही. त्यामुळे त्यांनी चर्चा करून मार्ग काढावा. मला तरी हेच बरोबर वाटतं", असं जॉनी लिव्हर टाइम्स नाऊशी बोलताना म्हणाले.

'हेरा फेरी ३'  सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर परेश रावल यांनी सिनेमातून एक्झिट घेतली. 'हेरा फेरी' सिनेमातील त्यांचं बाबुराव हे पात्र प्रचंड गाजलं. मात्र आता त्यांनी या फ्रँचायझीमधून एक्झिट घेतल्यानंतर 'हेरा फेरी ३'मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकुट आणि बाबुराव पाहायला मिळणार नसल्याने चाहते नाराज आहेत. 

टॅग्स :परेश रावलजॉनी लिव्हर