Join us

जॉन-जॅक जोडीची ‘हिट हॅट्रिक’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 16:53 IST

जेव्हा बॉलिवूडमधील  हॉट अभिनेता व अभिनेत्रीची जोडी स्क्रीनवर येते, तेव्हा त्यांची सिजलींग केमेस्ट्री प्रेक्षकांनाही आवडेल . अशीच एक हॉट जोडी ...

जेव्हा बॉलिवूडमधील  हॉट अभिनेता व अभिनेत्रीची जोडी स्क्रीनवर येते, तेव्हा त्यांची सिजलींग केमेस्ट्री प्रेक्षकांनाही आवडेल . अशीच एक हॉट जोडी लवकरच ‘ढिशूम’मध्ये आपल्याला दिसणार आहे. ही हॉट जोडी म्हणजे जॉन अब्राहम आणि जॅकलीन फर्नांडिस यांची. ‘ढिशूम’पूर्वी ‘हाऊसफुल २’आणि ‘रेस २’यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये जॉन व जॅकची सिजलिंग केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडली. त्यामुळेच हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर हिट ठरले होते. आता जॉन व जॅक ढिशूम घेऊन येत आहेत. साहजिकच या चित्रपटात ही हॉट जोडी काय कम्माल करते, याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहे. जॉन व जॅकलीनची जोडी पडद्यावर नेहमीच हॉट दिसते. ‘ढिशूम’मध्येही जॉन व जॅक एकदम हॉट दिसताहेत. तेव्हा जॉन जॅक हिट चित्रपटाची हॅट्रिक करतात वा नाही, ते बघूच!!