Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘फोर्स ३’मध्ये अ‍ॅक्टर-प्रोड्युसर असेल जॉन अब्राहम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 19:09 IST

बॉलिवूडचा ‘हंक’ जॉन अब्राहम ‘फोर्स २’ला मिळालेल्या यशाने त्याचा उत्साह वाढला असून या चित्रपटाचा तिसरा भागातही आपण काम करू ...

बॉलिवूडचा ‘हंक’ जॉन अब्राहम ‘फोर्स २’ला मिळालेल्या यशाने त्याचा उत्साह वाढला असून या चित्रपटाचा तिसरा भागातही आपण काम करू सोबतच या चित्रपटाची निर्मितीदेखील करणार आहे, असे जॉन अब्राहम याने सांगितले.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीनुसार जान अब्राहम ‘फोर्स’च्या तिसºया भागासाठी उत्सुक आहे. ‘फोर्स’ या चित्रपटाचे फ्रेंचायसीमध्ये रुपातंर व्हावे असे जॉनला आधीपासूनच वाटत होते. याचमुळे त्याने ‘फोर्स २’ च्या सिक्वलसाठी होकार दिला आहे. ‘फोर्स’च्या प्रदर्शनानंतर जेव्हा ‘फोर्स २’ ची घोषणा करण्यात आली तेव्हापासून हा चित्रपट व त्याची स्टारकास्ट चांगलीच चर्चेत होती. ‘फोर्स’चे दिग्दर्शन निशिकांत कामथ यांनी केले होते तर ‘फोर्स २’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनय देव यांनी सांभाळली होती. विपूल शाह निर्मित या ‘फोर्स’च्या दोन्ही भागात भरपूर अ‍ॅक्शन व दमदार कथा असल्याने  या चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळविता आले. जॉन अब्राहम म्हणाला, मी अभिनेता व प्रोस्ट्युसर म्हणून ‘फोर्स ३’ मध्ये सहभागी होणार आहे. आम्ही ‘फोर्स ३’ तयार करणार आहोत व याचे दिग्दर्शन अभिनय देव करतील. विपूल शाह आणि मी याचित्रपटाचे निर्माते असून २०१७ च्या मधोमध आम्ही या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार आहोत. नुकतेच ‘फोर्स २’ च्या टीमने नुकताच चित्रपटाला मिळालेल्या यशाचा जल्लोष केला. या पार्टीमध्ये जॉन बाईकवरून आला होता. याविषयी जॉन म्हणाला, मला जेव्हा फार आनंद होतो तेव्हा मी बाईक चालवितो. ‘फोर्स २’ला मिळालेला रिस्पॉन्स चांगला आहे. यामुळे मी विचार केला. हा आनंद बाईक चालवून साजारा करावा. आम्ही ‘फोर्स २’साठी बरीच मेहनत घेतली आहे. त्याचे फळही आम्हाला मिळाले. आम्ही सर्वच आनंदी आहोत.