Join us

​जॉन अब्राहम व प्रियाचा संसार धोक्यात??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 16:14 IST

यावर्षी बॉलिवूडमधील अनेक जोड्या तुटतांना दिसल्या. अनेक बी-टाऊन कपलने घटस्फोटासाठी अर्ज करीत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेता जॉन ...

यावर्षी बॉलिवूडमधील अनेक जोड्या तुटतांना दिसल्या. अनेक बी-टाऊन कपलने घटस्फोटासाठी अर्ज करीत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल या दोघांच्या संसारातही कुरबुरी सुरु असल्याचे वृत्त एका आॅनलॉईन पोर्टलने दिले आहे. जॉन व प्रियामध्ये चांगलेच बिनसले असून हे नाते तुटण्याच्या वाटेवर असल्याचे समजते. ‘धूम’मध्ये जॉनसोबत काम करणाºया एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जॉन व प्रिया या दोघांमध्ये फारसे काही वाईट नाही तसेच फारसे काही सुरळीतही नाही. कदाचित एकमेकांपासून दूर राहत असल्यामुळे दोघांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. जॉन व प्रिया फार कमी एकत्र असतात. जॉन आपल्या करिअरच्या या टप्प्यावर बिझी आहे तर प्रिया ही सुद्धा अमेरिकेतील तिच्या जॉबमधून वेळ काढू शकत नाहीयं. जॉनच्या बॉलिवूडमधील मित्रांसोबतही ती फारसे जुळवून घेऊ शकलेली नाही. कदाचित त्याचमुळे दोघांमध्ये कुरबुरी वाढल्याची खबर आहे. अशास्थितीत आपण काय करणार..तूर्तास तरी जॉन व प्रियामध्ये सगळे काही आॅलवेल व्हावे, इतकीच कामना करूयात!!