Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉनने रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्या होत्या ६४ चपात्या, तेव्हा वेटर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 09:54 IST

हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम  ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘अटॅक’ या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने ही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कपिलसोबत अनेक गोष्टीवर गप्पा मारल्या. यावेळी शोचा होस्ट कपिल शर्मा जॉनला प्रश्न केला, “ तू एकदा रेस्टॉरंटमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या ही अफवा खरी आहे का? ” यावर उत्तर देत जॉन म्हणाला, “हो, हे खरं आहे आणि जेव्हा मी हे केलं तेव्हा, वेटर आला आणि म्हणाला, अजून भात पण आहे.” ‘ अटॅक ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दीपिकाला टाइम इम्पॅक्ट पुरस्कार निश्चित

शास्त्रज्ञ आणि सीईओ, कलाकार आणि कार्यकर्ते, पॉप स्टार आणि राजकारण्यांमध्ये जगप्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती दीपिका पदुकोणचा समावेश झाला आहे. दीपिकाला टाइम इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दीपिकाने चित्रपटसृष्टीतील काही उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. यापैकी अनेकांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे आणि ते सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरले आहेत. तिने नैराश्याविरुद्धच्या लढाईबद्दल आवाज उठवला होता.

‘केजीएफ’च्या  ट्रेलरमध्ये संजय दत्तचा  ‘डॅशिंग लूक ’ 

गेल्या ३ वर्षांपासून सुपरस्टार यशच्या ‘ केजीएफ २’ या यंदाच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. आता ‘केजीएफ’ Chapter 2’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  रवीनाच्या एन्ट्रीनंतर चित्रपटातील खलनायक म्हणजे संजय दत्तची एन्ट्री ही ‘ तलवार चलाकर, खून बहाकर जंग लड़ना तबाही नहीं, तरक्की होती है. उसमें लाशें भी बेकार नहीं जाती. चाहिए तो गिद्धों से पूछ ले,’ या डायलॉगने होते. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता रॉकी भाईची एन्ट्री ‘वायलेंस.. वायलेंस.. वायलेंस, आई डोंट लाईक इट. आई अवॉईड…बट वायलेंस लाईक मी, आई कान्ट अवॉईड,’ या डायलॉगने होते. 

टॅग्स :जॉन अब्राहमसिनेमाद कपिल शर्मा शो