Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिग्नेश-बेबीच्या आगामी जाहीरातीत धम्माल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 09:30 IST

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या दोघांनी ‘मेक माय ट्रीप’ च्या जाहीरातींमध्ये त्यांच्या जोडीची अतिशय उत्तम केमिस्ट्री दाखवली आहे. ...

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या दोघांनी ‘मेक माय ट्रीप’ च्या जाहीरातींमध्ये त्यांच्या जोडीची अतिशय उत्तम केमिस्ट्री दाखवली आहे. अत्यंत फनी अशा या जाहीरातीत त्यांची जोडी ही परफेक्ट मॅच दिसते आहे.एका जाहीरातीत आलिया टॅक्सी ड्रायव्हर तर दुसऱ्यात हॉटेल रिसेप्शनिस्ट आणि रणवीर एकात बंगाली टुरिस्ट तर दुसऱ्यात बंडखोर ग्राहक बनतो. आता ते एका नव्या थीमवर आधारित जाहीरातीवर काम करत आहेत. याची चर्चा सोशल नेटवर्किंग साईटवर पहावयास मिळते आहे.नव्या अ‍ॅडमध्ये रणवीर ‘जिग्नेश’ या गुजराती तरूणाच्या भूमिकेत तर आलिया ‘बेबी’ च्या भूमिकेत दिसत आहेत. हे एक गुजराती जोडपे मेक माय ट्रीप च्या जाहीरातीत दिसणार आहे. ‘अ‍ॅडव्हेंचर्स आॅफ जिग्नेश अ‍ॅण्ड बेबी’ या टॅगखाली ही जाहीरातीत रिलीज करण्यात येणार आहे.या जाहीरातीत बेबी अपसेट होते कारण त्यांचे मागील हॉटेल बुकिंग कॅन्सल होते आणि पैसेही वाया जातात. तेव्हा जिग्नेश बेबीला समजावण्याचा प्रयत्न करतो. आणि तिला टेन्शन न घेण्यास सांगतो. तो स्वत: ही अडचण सोडवण्याचे आश्वासन तिला देतो.आता पुढे काय होते? पाहूयात ....अद्याप जाहीरात रिलीज केलेली नाही.