Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जान्हवी कपूर व इशान खट्टर पुन्हा दिसले एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 11:40 IST

श्रीदेवी व बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरची स्वत:ची एक ‘स्टाईल अ‍ॅण्ड टशन’ आहे. जिथे जाईल, तिथे जान्हवी सगळ्यांच्या नजरा ...

श्रीदेवी व बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरची स्वत:ची एक ‘स्टाईल अ‍ॅण्ड टशन’ आहे. जिथे जाईल, तिथे जान्हवी सगळ्यांच्या नजरा आकर्षून घेते. बुधवारी जान्हवी कपूर हॉलिवूड अ‍ॅक्शन मुव्ही ‘बेबी ड्राईव्हर’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली. यावेळी जान्हवीसोबत आणखी एक व्यक्ती होती. होय, ही व्यक्ती म्हणजे, शाहिद कपूरचा लाडका भाऊ इशान खट्टर.जान्हवी व इशान दोघेही एकाच गाडीतून या स्क्रिनिंगला पोहोचले. यापूर्वी प्रियांका चोप्राची ‘बेवॉच’ आणि करण जोहरच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन्ही चित्रपटांच्या स्पेशल स्क्रिनिंगलाही हे दोघे एकत्र पोहोचले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे जान्हवी व इशान दोघेही बेस्ट फ्रेन्ड आहेत. ALSO READ : भावाचा सल्ला डावलून पुन्हा जान्हवी कपूरसोबत दिसला इशान खट्टर!अलीकडे जान्हवी कपूर आणि इशान खट्टर  हे दोघेही शेनली वुडलीच्या ‘फॉल्ट इन अवर स्टार’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसू शकतात, अशी बातमी होती. शशांक खैतान हा या चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याचेही समजले होते. अर्थात या बातमीत किती सत्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कारण तूर्तास तरी याबद्दल काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या हॉलिवूडपटाच्या बॉलिवूड रिमेकसाठी अनेक बॉलिवूड जोड्यांची नावे चर्चेत होती. सर्वप्रथम यात दीपिका पादुकोण व सुशांत सिंह राजपूत यांची वर्णी लागणार, अशी बातमी होती. यानंतर आलिया भट्ट आणि आदित्य राय कपूर यां दोघांचे नाव चर्चेत आले होते. पण  कदाचित मेकर्सला यासाठी एक फ्रेश जोडी हवी आहे. त्यामुळे मेकर्सनी जान्हवी व इशानच्या नावाला पसंती दिल्याचे या बातमीत म्हटले होते. आता खरे काय, ते लवकरच कळेल. तूर्तास तुम्ही जान्हवी व इशानचे हे ताजे फोटो बघू शकता.  सध्या इशान माजिद माजिदी यांच्या ‘बियॉन्ड दी क्लाऊड्स’ या चित्रपटात बिझी आहे.