Join us

जान्हवी कपूर अन् ईशान खट्टरच्या चित्रपटाचे नवे पोस्टर ‘धडक’ले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 20:33 IST

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अन् अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर सध्या त्यांच्या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच ...

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अन् अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर सध्या त्यांच्या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले असून, त्यामध्ये जान्हवी आणि ईशान अतिशय रोमॅण्टिक अंदाजात बघावयास मिळत आहेत. सुपरहिट मराठी ‘सैराट’चा हिंदी रिमेक असलेल्या त्यांच्या ‘धडक’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करीत आहे. चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून, आतापर्यंत त्याचे बरेचसे पोस्टर समोर आले आहेत. पोस्टरमध्ये ज्यापद्धतीने जान्हवी आणि ईशान दिसत आहेत, त्यावरून चित्रपटात मराठी ‘सैराट’प्रमाणेच रोमॅण्टिक केमिस्ट्री दाखविली जाण्याची शक्यता आहे. या नव्या पोस्टरचे वैशिष्ट्ये म्हणजे यावर चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे. होय, बहुप्रतिक्षित ‘धडक’ हा चित्रपट याच वर्षी २० जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी ईशान आणि जान्हवी खूपच उत्साहित आहेत. बºयाचदा दोघे डिनर डेटवर एकत्र जाताना बघावयास मिळाले. वास्तविक करणचीच ही इच्छा आहे की, दोघांनी एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ व्यतित करावा. जेणेकरून चित्रपटात प्रेक्षकांना दोघांचे खरे प्रेम बघायला मिळावे. चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करीत असून, ब्लॉकबस्टर ‘सैराट’चीच कथा यात दाखविली जाण्याची शक्यता आहे. मात्र ‘सैराट’च्या अन् ‘धडक’च्या कथेत काहीसे बदल केले जाणार असल्याचे यापूर्वीच खेतान यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, रिलीज झालेल्या नव्या पोस्टरमध्ये दोन्ही स्टार एखाद्या लवबर्डसारखे दिसत आहेत. त्याचबरोबर पोस्टरवरील चित्रपटाच्या नावाच्या अखेरीस रक्ताचा डाग दाखविण्यात आला आहे. चित्रपटाची शूटिंग गेल्या डिसेंबर महिन्यात राजस्थान या भागात करण्यात आली. जान्हवी आणि ईशानने दमदारपणे शूटिंग केल्याचे समजते. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच.