Jhalak Dikhhla Jaa 9: ‘या’ दोघांशिवाय हृतिक रोशन डान्सर बनूच शकला नसता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 11:43 IST
बॉलीवूडमध्ये आतापर्यंत जेवढे काही डान्सिंग सुपरस्टार्स झळकलेले आहेत त्यामध्ये ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनचे नाव सर्वात आधी घ्यावे लागेल. ‘कहो ...
Jhalak Dikhhla Jaa 9: ‘या’ दोघांशिवाय हृतिक रोशन डान्सर बनूच शकला नसता!
बॉलीवूडमध्ये आतापर्यंत जेवढे काही डान्सिंग सुपरस्टार्स झळकलेले आहेत त्यामध्ये ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनचे नाव सर्वात आधी घ्यावे लागेल. ‘कहो ना प्यार है’मधील त्याच्या ‘एक पल का जीना’ या गाण्यातील लोकप्रिय डान्स स्टेप अशी काही गाजली की हृतिक रातोरात ए-लिस्ट सेलिब्रेटी बनला.त्याचं दिसणं, रुप आणि अभिनयाबरोबरच त्याच्या जबरदस्त डान्सिंग स्क ील्सचाही त्याच्या यशामध्ये मोठा वाटा आहे यात काही शंकाच नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का की, हृतिक एवढा चांगला डान्सर होण्याामागे कोणाचा हात आहे? कोण आहे ज्याच्याशिवाय तो आज इतका परफेक्ट डान्सर बनूच शकला नसता असे त्याला वाटते?► ALSO READ: हृतिक रोशनबद्दल १० रंजक फॅक्ट्सफराह खान आणि गणेश हेगडे हे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी हृतिकला डान्समधील एकूण एक बारकावे शिकवले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तो एवढा चांगला डान्सर बनला आहे. याची कबुली त्याने स्वत: एका कार्यक्रमात दिली. डान्सिंग रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’च्या अंतिम भागात हृतिक स्पेशल गेस्ट म्हणून आला होता तेव्हा त्याने सांगितले की, ‘फराह आणि गणेशशिवाय मी डान्सर बनूच शकलो नसतो.’ यावेळी त्याने दोघांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याच्या पहिल्या चित्रपटातील ‘प्यार की कष्टी में’ गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली होती तर ‘कोई मिल गया’साठी गणेश हेगडेने हृतिकसोबत काम केले होते. फराह हृतिकला स्टेप चुकल्यावर कशी ओरडायची याबाबत सांगताना ती म्हणाली की, ‘सुरुवातीला मी डुग्गुला (हृतिक) स्टेप चुकली की खूप रागवायचे.’►ALSO READ: रईस- काबिलमध्ये या गोष्टींचे आहे साम्यहे सर्व झाल्यावर हृतिक, फराह आणि गणेशने स्टेजचा ताबा घेत ‘इट्स मॅजिक’ आणि ‘एक पल का जीना’ या गाण्यावर ठेका धरला. तेरिया मगर हीने सलमान युसुफ खान आणि शंतनू माहेश्वरी यांना हरवून ‘झलक दिखला जा’च्या नवव्या सीझनचे विजेतेपट पटकावले. विशेष म्हणजे तेरिया वाईल्ड कार्डद्वारे या शोमध्ये सहभागी झाली होती.हृतिकचा आगामी चित्रपट ‘काबील’ येत्या २५ जानेवारीला रिलीज होत असून त्याची टक्कर शाहरुख खानच्या ‘रईस’सोबत होणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्यामुळे कोण बाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.