Join us

शाहरुख खानच्या 'जवान'ने रिलीज आधीच मेकर्सना केलं मालामाल, कमावले कोट्यवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:20 IST

पठाण' चित्रपटानंतर शाहरुख खान 'जवान' चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स समोर आले आहेत.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने 2023 मध्ये 'पठाण' चित्रपटाद्वारे जोरदार कमबॅक केले आहे. पठाणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'पठाण' चित्रपटानंतर शाहरुख खान 'जवान' चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स समोर आले आहेत. अनेक वेळा चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे निर्मातेही खूप नाराज दिसले.आता या सगळ्यानंतर एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचे नॉन-थिएटर राइट्स जवळपास कोट्यवधींनी विकले गेले आहेत.

शाहरुख खान 'पठाण' चित्रपटानंतर 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर गाजवण्यास तयार आहे. दरम्यान, 'जवान' चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडो रुपयांची कमाई केल्याची बातमी समोर येत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे नॉन-थिएटर राइट्स जवळपास 250 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामध्ये चित्रपटाच्या डिजिटल, सॅटेलाइट आणि संगीत हक्कांचा समावेश आहे. त्यानंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच हिट झाला आहे. जवान व्यतिरिक्त 'डँकी' चित्रपटाचे नॉन थिएटर राइट्स सुमारे 230 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

कधी रिलीज होणार पठाणशाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत दिसणार आहे. शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 2 जूनला पहिल्यांदा प्रदर्शित होणार होता.  पण नंतर निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट बदलली. आता शाहरुख खानचा 'जवान' 7 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खान