Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कट्टर’ संबोधल्याने संतापले जावेद अख्तर; म्हटले, ‘त्यात तुझा दोष नाही, कारण मी तुझा बाप नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 16:46 IST

बॉलिवूडचे प्रख्यात लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. ते नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून आपले मत लोकांसमोर ...

बॉलिवूडचे प्रख्यात लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. ते नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून आपले मत लोकांसमोर ठेवतात. आता पुन्हा एकदा जावेद अख्तर त्यांच्या ट्विट्समुळे चर्चेत आले आहेत. होय, काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले होते, त्यांच्या या ट्विटला काही युजरने कॉमेण्ट देताना ‘कट्टर’ हा शब्दप्रयोग केला. ही बाब त्यांना अजिबातच भावली नाही. ‘कट्टर’ संबोधल्यामुळे ते असे काही संतापले की, त्यांनी त्यांचा संपूर्ण राग ट्विटच्या माध्यमातूनच व्यक्त केला. एका युजरने ट्विट करताना त्यांना म्हटले होते की, ‘अख्तर चांगले कवी आहेत, परंतु ते कट्टर आहेत हे आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले आहे.’या ट्विटमुळे जावेद अख्तर यांचा प्रचंड संताप झाला. त्यांनी त्याला उत्तर देताना लिहिले की, ‘मी माझ्या आयुष्यात बरेचसे कॉक्रोच बघितले, ज्यांचा आयक्यू तुझ्यापेक्षा अधिक आहे. मी तुझा जळफळाट समजू शकतो, तू काहीच नाहीस अन् काही न करताच मरणार आहेस. तू कुठल्याच कामाच्या लायक नाहीस. त्यात माझी काहीही चुकी नाही, कारण मी तुझा बाप नाही.’ याव्यतिरिक्त त्यांनी आणखीही काही ट्विट करून त्या युजरवर आपला संताप काढला.  या अगोदरही जावेद अख्तर यांनी, एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांच्या नपुंसक विधानावरून त्यांचा समाचार घेतला होता. त्यांनी म्हटले होते की, हे वक्तव्य करून ओवैसीने उद्धटपणाचा कळस गाठला आहे. त्यांना त्यांच्या या वक्तव्याची लाज वाटायला हवी. काही दिवसांपूर्वीच ओवैसीच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांची खिल्ली उडविताना दिसत होते. ओवैसीने म्हटले होते की, ‘व्हीएचपीवाले चार-चार मुले जन्माला घालण्याचा सल्ला देतात. मात्र स्वत: एकही मूल जन्माला घालू शकत नाहीत. जर तुम्ही मुलांना जन्माला घालू शकत नसाल तर औरंगाबादमध्ये एक पानटपरी आहे. त्याठिकाणी शरफूभाईचे पान खा, टनाटन काम होऊन जाईल.’ जावेद अख्तर यांनी ओवैसीच्या याच वक्तव्याचा ट्विटरवर समाचार घेतला होता.