Join us
Daily Top 2Weekly Top 5

 Javed Akhtar :  संपूर्ण जगाला तुमची गरज..., जावेद अख्तर यांची थेट मिशेल ओबामांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 10:45 IST

बॉलिवूडचे लेखक व गीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar) यांचं एक ट्वीट सध्या तुफान व्हायरल होतंय.

बॉलिवूडचे लेखक व गीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar)यांचं एक ट्वीट सध्या तुफान व्हायरल होतंय. होय, जावेद अख्तर यांनी थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा (Michelle Obama) यांच्यासाठी हे ट्वीट  केलं आहे.

मिशेल ओबामा या त्यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ‘द लाइट वी कॅरी टुर’ नावाचा एक उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाअंतर्गत मिशेल त्यांच्या या पुस्तकाबद्दल लोकांना माहिती देणार आहेत. मिशेल यांचं पुस्तक येत्या 15 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे आणि त्यासाठीच मिशेल अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहेत.   मिशेल यांनी एक ट्वीट करत त्यांच्या या उपक्रमाची माहिती दिली. त्यांच्या या माहिती दिली. त्या या ट्वीटला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी मिशेल यांना एक भावुक विनंती केली.

‘ प्रिय मिशेल ओबामा, मी कुणी तुमचा तरुण वेडा चाहता नाही, तर मी एक 77 वर्षांचा भारतीय कवी आहे. प्रत्येक भारतीयाला माझं नाव ठाऊक असेल. पण मॅडम कृपा करून माझे शब्द गंभीरपणे घ्या... सध्या केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला व्हाईट हाऊसमध्ये तुमची गरज आहे. तुम्ही ही जबाबदारी झिडकारता कामा नये...,’अशा आशयाचं ट्वीट जावेद अख्तर यांनी केलंं आहे.

या ट्वीटनंतर अनेकांनी जावेद अख्तर यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मॅडम मिशेल, प्लीज जावेद अख्तरांचं ऐका. तुमचे पती व्हाईट हाऊस सोडून गेल्यावर त्यांचा इन्सेंटिव्ह थांबला आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे. जावेद अख्तर, कोण हे आम्ही यांना ओळखत नाही, अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

टॅग्स :जावेद अख्तरअमेरिका