रॅपर हनी सिंग आणि वाद हे समीकरण तसं जुनं आहे. हनी सिंगच्या अडचणीत दिवसांदिवस वाढ होताना दिसतेय. 'मखना' या गाण्यामुळे हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या गाण्यात महिलांबाबत अभद्र आणि अशोभनीय शब्द वापरल्याचा आरोप पंजाबच्या महिला आयोगाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता पंजाबी गायक जसबीरने सुद्धा हनी सिंगवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.मखना गाण्यामध्ये वापरण्यात आलेल्या शब्दांवर आता जसबीरने देखील आक्षेप घेतला आहे. या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे तसेच कारवाईच करण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे.
पंजाबच्या महिला आयोगा पाठोपाठ 'या' गायकाने केली हनी सिंगवर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 14:01 IST
रॅपर हनी सिंग आणि वाद हे समीकरण तसं जुनं आहे. हनी सिंगच्या अडचणीत दिवसांदिवस वाढ होताना दिसतेय. 'मखना' या गाण्यामुळे हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे
पंजाबच्या महिला आयोगा पाठोपाठ 'या' गायकाने केली हनी सिंगवर कारवाईची मागणी
ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडून 12 जुलैपर्यंत याबाबतचा रिपोर्ट मागितला आहे