Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेन्डने 'धडक' पाहून दिली ही रिअॅक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 17:43 IST

अनेक सेलिब्रिटींनी मात्र या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. पण यात एका प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे. ती म्हणजे जान्हवीच्या एक्स बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया प्रतिक्रिया.

मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या 'धडक' सिनेमाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांना हा सिनेमा आवडला तर काहींना नाही. पण अनेक सेलिब्रिटींनी मात्र या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. पण यात एका प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे. ती म्हणजे जान्हवीच्या एक्स बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया प्रतिक्रिया.

जान्हवीचा एक्स बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया याने नुकताच सिनेमा पाहिला असून आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याला हा सिनेमा फार आवडला असून त्याने थेट सिनेमागृहातून एक फोटो शेअर केलाय. 

शिखर आणि जान्हवीच्या अफेअरची चर्चा तेव्हा रंगली होती जेव्हा जान्हवी आणि त्याचे काही खाजगी फोटो व्हायरल झाले होते. शिखर हा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. २०१६ मध्ये दोघांची फार चर्चा झाली होती. कारण त्यांची किसींग करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. 

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांमध्ये बिनसलं होतं. त्यानंतर दोघे वेगळे झाले होते. आता जान्हवी आपल्या करिअरकडे लक्ष देत आहे. पण अजूनही दोघे चांगले मित्र आहेत. धडक या सिनेमाने आतापर्यंत ३३ कोटी रूपयांची कमाई केली आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपटबॉलिवूड