Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी साडी अन् दिलखेचक अदा...जान्हवी कपूर अंबानींच्या पार्टीत, पण चर्चा बॉयफ्रेंडची, गेटवर रिसिव्ह करायला आला; पाहा Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:40 IST

बॉलीवूडची नेक्स्ट जनरेशन अभिनेत्री जान्हवी कपूरनं काल उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याच्या पार्टीसाठी हजेरी लावली.

बॉलीवूडची नेक्स्ट जनरेशन अभिनेत्री जान्हवी कपूरनं काल उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याच्या पार्टीसाठी हजेरी लावली. नुकतंच राजस्थानमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा समारंभ झाला. त्यानंतर मुंबईत अंबानींच्या 'अँटेलिया'वर जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत बॉलीवूडमधील दिग्गजांनी उपस्थिती लावली. जान्हवी कपूरनं यावेळी आपल्या मनमोहन अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

अँटेलियावरील या पार्टीसाठी जान्हवीनं गुलाबी रंगाच्या साडीला प्राधान्य दिलं होतं. जान्हवीच्या दिलखेच अदांनी सर्वांचं लक्ष वेधून तर घेतलंच पण चर्चा झाली ती तिला अँटेलियाच्या गेटवर रिसिव्ह करायला आलेल्या शिखर पहारिया याची. जान्हवी आणि शिखर पहारिया यांच्यातील नात्याची याआधीही चर्चा होती. मध्यंतरी दोघांचं ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण जान्हवी पार्टीसाठी पोहोचली असल्याचं शिखर पहारिया याला कळलं आणि तो तिला रिसिव्ह करण्यासाठी गेटवर उपस्थित होता. शिखर पहारिया हा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. 

शिखरनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. यापूर्वीही जान्हवी शिखरसोबत दिल्लीतील एका कार्यक्रमात दिसली होती आणि त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिखर आणि जान्हवी एकत्र मालदीवमध्येही गेले होते. अर्थात जान्हवीने कधीही हे रिलेशनशिप मान्य केले नाही. पण दोघांमधील बॉन्ड पाहता 'ये पब्लिक है सब जानती है' असंच म्हणावं लागेल.

टॅग्स :जान्हवी कपूरमुकेश अंबानी