अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक'मधून करिअरला सुरुवात केली. या सिनेमात तिची ईशान खट्टरसोबत जोडी होती. सिनेमासोबत याची गाणीही हिट झाली. जान्हवीच्या पहिल्याच सिनेमाच्या रिलीजआधी तिची आई अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. करिअरचे सुरुवातीचे दिवस आठवताना जान्हवी भावुक झाली. त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये गेली होती असाही खुलासा तिने केला.
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'धडक' हा तिचा पहिलाच सिनेमा रिलीज झाल्यानंतर ती खूप निराश झाली होती. लोकांना आपल्याबद्दल घृणा वाटते आणि आपलं करिअर संपलं आहे असा तिचा समज झाला होता. जान्हवी म्हणाली, "जेव्हा आजही लोक 'धडक'बद्दल बोलतात तेव्हा सिनेमा चांगला होता असं म्हणतात. तुम्ही बरेच पैसे कमावले असंही म्हणतात. पण माझ्या मनात आठवणी वेगळ्या आहेत. सिनेमाच्या रिलीजनंतर मी नैराश्यात गेले होते. मला वाटलेलं की लोक मला पसंत करत नाहीत."
ती पुढे म्हणाली, "मला आयुष्यात सर्वात जास्त पाठिंबा माझ्या आईकडूनच मिळाला होता. आई गेल्यानंतर मी विचार केला की आता सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे. सर्वांनी मला पसंत करावं असंच मला वाटत होतं. पण असं झालं नाही. मी केवळ नकारात्मक गोष्टींवरच लक्ष केंद्रित करायचे. 'धडक' ब्लॉकबस्टर हिट सिनेमा होता याची मला जाणीवही नव्हती. मी खूप नैराश्यात असल्याने मला सिनेमाच्या यशाची आणि लोकांनी मला किती पसंत केलंय याची काहीच कल्पना नव्हती."
Web Summary : Janhvi Kapoor revealed she battled depression after her debut film 'Dhadak's' release due to her mother's passing and feeling unaccepted by the audience, despite the film's success.
Web Summary : जाह्नवी कपूर ने खुलासा किया कि अपनी पहली फिल्म 'धड़क' की रिलीज़ के बाद वह डिप्रेशन से जूझ रही थीं, इसकी वजह उनकी मां का निधन और फिल्म की सफलता के बावजूद दर्शकों द्वारा स्वीकार नहीं किए जाने की भावना थी।