Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय 23 व्या वर्षी जान्हवी कपूरला हवे मुल? सोशल मीडियावर दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 11:28 IST

जान्हवी कपूरला लग्नाची नाही मुलाची घाई, सोशल मीडियावर खुल्लमखुल्ला व्यक्त केली इच्छा

ठळक मुद्देलवकरच जान्हवी रूही अफजाना, तख्त या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येही ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

 बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिची आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी जान्हवी आज एक स्टार आहे. आई श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरायला जान्हवीला बराच वेळ लागला. तूर्तास जान्हवी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. होय, जान्हवीने अशी काही इच्छा प्रकट केली की, चाहते हैराण झालेत.

जान्हवीने इन्स्टाग्रामवर नुकताच स्वत:चा एक सुंदर फोटो शेअर केला.  ‘Here’s looking at you, kid’, असे तिने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले. ‘येथे तुला बघते बच्चा,’ या तिच्या कॅप्शनने अनेकांना गोंधळात टाकले. तिच्या कॅप्शनचा नेमका अर्थ न कळल्याने मग प्रश्नोत्तरेही सुरु झालीत.  दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनीषा संतोषी हिलाही जान्हवीच्या कॅप्शनचा अर्थ कळला नाही. मग काय तिने जान्हवीला थेट विचारलेच.‘कोण बच्चा, म्हणजे तुला मुल हवे?’ असा सवाल तिने केला. यावर जान्हवीने ‘हो’ असे उत्तर दिले.

आता जान्हवीला खरोखरच मुल हवे की,   बच्चा म्हणजे कुणीतरी स्पेशल हवे, हे तर तिलाच ठाऊक. सध्या तिच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहते यावर वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत.अलीकडे जान्हवीच्या घरात काम करणारे तीन लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. यामुळे अख्खे कुटुंब चर्चेत आले होते. जान्हवी व खुशी यांचीही कोरोना चाचणी केली गेली होती. दोघींचीही चाचणी निगेटीव्ह आली होती.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगाये तर लवकरच ती रूही अफजाना, तख्त या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येही ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर