Join us
Daily Top 2Weekly Top 5

थेट राजस्थानहून जान्हवीला भेटायला आला चाहता, त्यानंतर जे काही घडले ते पाहून तुम्हालाही येईल राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 16:12 IST

जान्हवी कपूरचा असाच एक जबरा फॅन तिला भेटण्यासाठी थेट राजस्थानहून मुंबईत आला. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे.

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात.आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी फॅन्स अनेकदा त्यांना भेटवस्तू भेट देत असतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट झाले आहेत. या माध्यमातून दोघांनाही संवाद साधण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. मात्र तरीही आवडत्या सेलिब्रेटीला भेटता यावे, त्याची एक झलक पाहता यावी यासाठी अनेक गोष्टी करताना दिसतात. 

रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतात याचेच भान मात्र कधी कधी सेलिब्रेटी मंडळी विसरल्याचे पाहायला मिळते. जान्हवी कपूरचा असाच एक जबरा फॅन तिला भेटण्यासाठी थेट राजस्थानहून मुंबईत आला. जान्हवी जेव्हा जिममधून बाहेर आली तेव्हा तिला पाहताच चाहत्याने ओरडून तिचे लक्ष वेधून घेतले. जान्हवीचे त्याच्याकडे लक्ष जाताच त्याने राजस्थानहून खास भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. 

चाहत्याने एकदा भेटून त्याने आणलेले गिफ्ट स्विकारण्याची विनंती जान्हवीला केली. यावेळी जान्हवी थोडी गोंधळलीही होती. पण शेवटी बॉडीगार्डच्या मदतीने चाहत्याला बिल्डींगच्या आवारात येण्यास सांगितले. आणि चाहत्याने आणलेले गिफ्टही स्विकारले. यावेळी चाहत्याचे प्रेम पाहून जान्हवीने चाहत्यांचे मनं जिंकले असेल असे तुम्हाला वाटले असेल मात्र असे काहीही झाले नाही. याऊलट फार जास्त आनंद व्यक्त न करता त्याच्यासमोर गाडीत बसून निघून गेली. 

सध्या चाहत्याच्या  या खास भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून जान्हवीचे असे वागणेही अनेकांना आवडले नाही. त्यांनीही कमेंट् करत यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. तसेच उगाच आपण त्यांना इतके भाव देतो अशा प्रतिक्रीयाही या व्हिडीओवर उमटत आहेत. 

टॅग्स :जान्हवी कपूर