Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो ! बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला कारनामा, रस्त्यावर चालवली चक्क ई-रिक्षा, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 12:24 IST

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

 सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री ई-रिक्षा चालवताना दिसते आहे. हा कारनामा करुन दाखवला आहे अभिनेत्री जान्हवी कपूरने. आपल्या चित्रपटाच्या सेटवर ती  ई-रिक्षा चालवताना दिसतेय. . या रिक्षात आणखी काही लोक मागे बसलेले दिसतायेत. जान्हवी सध्या तिच्या 'गुड लक जेरी' सिनेमाची शूटिंग करते आहे. सेटवरचे तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे मजेदार आहेत.

'गुड लक जेरी'च्या सेटवरील जान्हवीच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत जान्हवी ड्रेसमध्ये ई-रिक्षा चालवताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करताना जान्हवी कपूरने लिहिले, सिनेमाचे शूट्स मजेदार असते.  सिद्धार्थ सेन गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे या सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती रंग यलो प्रोडक्शन, लिका प्रॉडक्शन आणि सनडियल एंटरटेन्मेंट यांनी केली आहे. "

  जान्हवीने ‘धडक’ सिनेमातून ईशान खट्टरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'दोस्ताना 2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय जान्हवीच्या हातात करण जोहरची 'तख्त' देखील आहे. जान्हवीची बहीण खुशी कपूरच्या बॉलिवूडमध्ये एन्ट्रीची चर्चा सध्या जोरदार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूर