Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवा, ‘धडक’ यशस्वी होऊ दे! जान्हवी कपूरचे बालाजीला साकडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 11:08 IST

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. जान्हवीचा ‘धडक’ हा सिनेमा येत्या काही दिवसांत प्रदर्शित होत आहे. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. जान्हवीचा ‘धडक’ हा सिनेमा येत्या काही दिवसांत प्रदर्शित होत आहे. फिल्मी करिअरमधील पहिला चित्रपट यशस्वी व्हावा, असे कुणाला वाटणार नाही. सध्या जान्हवी सुद्धा हीच प्रार्थना करतेय. याच प्रार्थनेसाठी जान्हवी तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी पोहोचली. देवा, माझा चित्रपट यशस्वी होऊ दे, असे साकडे जान्हवीने तिरूपती बालाजीला घातले.पापा बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूर यांच्यासोबत जान्हवी तिरूपती बालाजी मंदिरात पोहोचली.

 यावेळी खुशी व जान्हवी दोघीही पारंपरिक पोशाखात दिसल्या. यावेळचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंदिरातील दर्शनानंतर जान्हवी व खुशी एअरपोर्टवरही दिसल्या.

श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर बोनी कपूर जान्हवी व खुशी या दोघींनाही फुलासारखे जपत आहेत. श्रीदेवींना जान्हवीच्या डेब्यू चित्रपटाची प्रतीक्षा होती. तिच्या डेब्यूकडे त्या डोळे लावून बसल्या होत्या. लेकीला यशस्वी होताना पाहणे, त्यांचे स्वप्न होते. पण जान्हवी पहिल्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी असतानाच, अचानक श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला. जान्हवी व खुशी या दोघींनाही हा धक्का पचवणे सोपे नव्हते. पण बोनी कपूर यांनी मुलींना मोठा आधार दिला.तूर्तास जान्हवी ‘धडक’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या सैराट या मराठी सिनेमाचा 'धडक' हा हिंदी रिमेक आहे.

 

टॅग्स :जान्हवी कपूर