Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळजी पोटी मीडियाने विचारला प्रश्न पुन्हा एकदा Janhavi Kapoor ने दाखवला अ‍ॅटिट्यूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 12:28 IST

अनेकदा जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) मीडियाला अशा प्रकारे चकवा देत असते. पण जेव्हा प्रमोशनची वेळ येते तेव्हा मात्र जान्हवी मीडियाच्या शोधात असते.

बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्याविषयीची प्रत्येक गोष्ट ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन त्यांचा स्वभावाचाही अंदाज चाहत्यांना येतो. कधी कधी सेलिब्रेटींना मिळालेल्या यशामुळे इतके काही हुरळून जातात की ते कसे वागत आहेत. कोणासमोर वागत आहेत याचे सुद्धा भान विसरतात.सध्या जान्हवी कपूर तिच्या अशाच अ‍ॅटिट्यूडमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वीच रात्री उशीरा जान्हवी कपर मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर घरी जायला निघाली. यावेळी तिने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. 

 

मीडियाला जान्हवी दिसताच त्यांनी तिला फोटो काढू देण्याची विनंती केली. एरव्ही मीडियाला पाहताच पोजवर पोज देणारी जान्हवी यावेळी मात्र मीडियाला कॅमेर्‍यांना टाळतांना दिसली. उशीर होत असल्याचे कारण देत तिने मीडियाला फोटोसाठी थेट नकार देत तिथून निघून गेली. यावेळचा तिचा हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिचा अ‍ॅटिट्यूड  बघून युजर्सनाही तिचे असे वागणं चांगलेच खटकल्याचे पाहायला मिळाले. 

पुन्हा एकदा तिचा असाच व्हिडीओ समोर आला आहे. जान्हवी कपूरच्या हाताला झालेली दुखापत पाहून मीडियाने तिच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी सुद्धा तिने काहीही उत्तर न देता तिथून निघून घेली. तिचे असं वागणं पाहून पुन्हा एकदा तिला जबरदस्त सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिचा अ‍ॅटिट्यूड युजर्सना अजिबात आवडलेला नाही.  ''लोकं हिला का इतका भाव देतात'', ''जान्हवी कपूरला लोकांनी उगाच प्रसिद्ध केलंय'', अशा कमेंट्स सध्या तिच्या या व्हिडीओवर उमटत आहेत.

 

तिला जेव्हा वाटेल तेव्हाच ती मीडियाला फोटोग्राफर्सना फोटो काढू देते. तिचा असाच एक किस्साही चांगलाच चर्चेत होता. अनेकदा सेलिब्रेटी जीमला जाताना मीडिया फोटोग्राफर्स त्यांचे फोट काढतांना दिसतात. जान्हवीला मात्र जीमला जाताना फोटो काढणे आवडत नाहीत. त्यामुळे ती अनेकदा मीडिया फोटोग्राफरने तिचे फोटो काढू नये यासाठी एक शक्कल लढवली होती. मीडिया फोटोग्राफरला पाहताच जान्हवी गाडीच्या डिक्कीत लपायची. जोपर्यंत मीडिया तिथून जात नाही ती डिक्कीतच लपून बसायची. अनेकदा जान्हवी मीडियाला अशा प्रकारे चकवा देत असते. पण जेव्हा प्रमोशनची वेळ येते तेव्हा मात्र जान्हवी मीडियाच्या शोधात असते.

टॅग्स :जान्हवी कपूर