अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही सध्या सिनेसृष्टीत आघाडीवर आहे. तिचा नुकताच 'परम सुंदरी' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये तिने मल्याळम मुलीची भूमिका साकारली आहे. शिवाय तिचा वरुण धवनसोबतचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा सिनेमाही रिलीज होणार आहे. दरम्यान परम सुंदरी च्या प्रमोशनसाठी जान्हवी आणि सिद्धार्थ मल्होत्राने 'कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली. यावेळी जान्हवीने तिला ३ मुलं हवीत अशी इच्छा व्यक्त केली. यामागचं कारणही तिने सांगितलं.
जान्हवी कपूर अनेकदा मुलाखतींमध्ये एकदम कॅज्युअल असते. कोणताही दिखावा न करता ती खऱ्या आयुष्यात कशी आहे हे तिच्या बोलण्यातून, वागण्यातून कळतं. नुकतंच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये कपिलने जान्हवीला विचारलं की तिला ३ मुलं हवी आहेत आणि ती साउथमध्ये सेटल होऊ इच्छिते. असं का? यावर जान्हवी म्हणाली, "मला वाटतं हेच चांगलं आहे. कारण आधी तर ३ हा माझा लकी नंबर आहे. दुसरं म्हणजे अनेकदा वाद हे दोन लोकांमध्ये होतात. अशा वेळी एकाला पाठिंबा देण्यासाठी तिसऱ्याची गरज असते. एक बहीण किंवा भाऊ जो कोणी असेल तो भांडणं मिटवेल. तो तिसरा दोन्ही बाजूंनीही असू शकतो. दोघांना पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे मी खूप विचार करुनच हे प्लॅनिंग केलं आहे."
जान्हवी कपूर ही बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत आहे. शिखर हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. दोघांनीही खुलेपणाने प्रेमाची कबुलीही दिली आहे. अनेकदा त्यांचे व्हेकेशनचे फोटो समोर आले आहेत. 'नवऱ्यासोबत तिरुमला येथे स्थायिक व्हायचंय आणि रोज केळ्याच्या पानांवर जेवायचं आहे' अशी इच्छा जान्हवीने व्यक्त केली होती. आता जान्हवी आणि शिखर लग्नबंधनात कधी अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.