Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी आणि ओरीचा पिंगा गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 17:37 IST

ओरी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे.

ओरी उर्फ ओरहान अवतारमणि हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  कधी जान्हवी कपूर, कधी सारा अली खान आणि अनन्या पांडे, कधी नीशा देवगण, नीता अंबानी किंवा इतर मोठ्या फिल्म स्टार्ससोबत दिसतो. आता ओरी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघे ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील दीपिका आणि प्रियांका चोप्राच्या पिंगा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. 

ओरीने जान्हवी कपूरबरोबरचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'नेहमी मस्ती' असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले. त्याच्या या व्हिडीओवर जान्हवीच्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले.  'मला तुझी खूप आठवण येते, बिग बॉससाठी तू मला विसरला', अशी कमेंट जान्हवीने केली आहे. 

नुकतेच ओरीने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आहे. याचा एक प्रोमो समोर आला आहे.  ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाला ऑक्टोबर महिन्यात सुरूवात झाली आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारूकी, विकी जैन, मनारा चोप्रा, फिरोजा खान, अभिषेक कुमार, इशा मालवीय या स्पर्धकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून बिग बॉसद्वारे स्वत:चा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. आता या तगड्या स्पर्धकांना ओरी कशी टक्कर देतो, हे लवकरच कळेल. 

ओरहान अवतारमणि एका उद्योगपतीचा मुलगा आहे. तो स्टार किड्सच्या खास मित्रांपैकी एक आहे. ओरहानला पार्ट्यांचा शौक असून तो अनेकदा मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसतो. ओरी टॉम फोर्ड, व्हिजन ऑफ सुपर आणि प्राडा यांसारख्या काही मोठ्या ब्रँडशी देखील जोडला आहे. ओरी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही ओळखला जातो. 

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबिग बॉस