Join us

जान्हवी कपूरच्या डेब्यूची तयारी झालीय सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 17:30 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशा चर्चा आहेत. सध्या जान्हवीचा ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशा चर्चा आहेत. सध्या जान्हवीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत असून या फोटोमध्ये ती फोटो शूट करताना दिसत आहे. यावरून तिच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी सुरू झाली असल्याचे मानले जात आहे. श्रीदेवीची मुलगी आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच बॉलिवूड सर्कलमध्ये चर्चेचा विषय ठरत आली आहे. जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे अशाचही चर्चा रंगतच असतात. काही दिवसांपूर्वी श्रीदेवीने जान्हवीला आपल्या ब्वॉयफ्रेण्डसोबत रिलेशनशीप तोडण्याचा सल्ला दिला होता. यामागील कारण तिचे बॉलिवूड करिअर सुरळीत सुरू व्हावे असे सांगण्यात येते. आता ही बातमी खरी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी पुरावा म्हणून एका फोटाचा पुरावा दाखविण्यात येत आहे. जान्हवीचा एक फोटो एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला आहे. यात ती फोटोशूट करताना दिसत आहे. आता हा फोटोशूट जाहिरातीसाठी आहे की, चित्रपटासाठी हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. मात्र या फोटोशूटमध्ये ती चांगलीच हॉट दिसत आहे. यात तिने ब्लू रंगाचा ड्रेस घातला आहे. फोटो पाहिल्यावर तिचा लुक आकर्षक वाटतो आहे. एकंदरीत तिचा हा फोटो पाहून हा चित्रपटासाठी केला जाणारा फोटोशूट असावा असे वाटतेय. म्हणजेच लवकरच जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये धमाका करणार हे नक्क ी. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार जान्हवी कपूर करण जोहरच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. जान्हवीचा पहिला ब्रेक मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक असू शकतो असेही सांगण्यात येत आहे. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली नाही हे तेवढेच खरे. मात्र फोटोशूटची चर्चा जोरात रंगते आहे.