Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर म्हणते, ये लम्हे हमेशा याद रहेंगे, येत्या 7 मार्चला जान्हवी कपूर होणार 21 वर्षांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 14:00 IST

श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूडचे फार मोठे  नुकसान झालेच आहे मात्र सगळ्यात जर जास्त कुणाचे नुकसान झाले आहे तर ते ...

श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूडचे फार मोठे  नुकसान झालेच आहे मात्र सगळ्यात जर जास्त कुणाचे नुकसान झाले आहे तर ते त्यांची मुलगी जान्हवी कपूर हिचे. येत्या 7 मार्चला जान्हवी 21 वर्षांची होणार आहे. या वर्षी तिचे बर्थ डे सेलिब्रेशन करायला किंवा त्याला शुभेच्छा द्यायला तिची आई नसणार आहे. गेल्या वर्षी जान्हवीच्या 20 व्या वाढदिवसाला श्रीदेवी यांनी इन्स्टाग्रामवर जान्हवीचा लहानपणींच्या फोटोंचा क्लोज करुन शुभेच्छा दिल्या. होत्या फोटो शेअर करताना त्यांनी एक कॅप्शनसुद्धा लिहिले होते. यावर्षी मात्र जान्हवीचा वाढदिवस साजरा करायला त्या नसणार आहेत.जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन त्या खूपच उत्साहित होत्या. सार्वजनिक ठिकाणी आवर्जून श्रीदेवी जान्हवीलासोबत घेऊन यायच्या. जान्हवीला लाँच करण्यासाठी त्यांनी धर्मा प्रोडक्शनची निवड केली. जान्हवीच्या डेब्यूची जबाबदारी त्यांनी करण जोहरवर सोपवली होती. सैराटच्या हिंदी रिमेक धडक मधून जान्हवी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिचा चित्रपट जुलैमध्ये रिलीज होणार आहे. लेकीचा पहिला चित्रपट पाहण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुलीच्या लाँचिगला घेऊन त्यांना फारच काळजी होती. प्रेक्षकांनी तिला आपल्या सारखेच भरभरुन प्रेम द्यावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र मुलीला मोठ्या पडद्यावर बघण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेचे राहिले. असे म्हणतात श्रीदेवी आपल्या दोन्ही मुलांच्या खूप जवळ होत्या. आई आणि मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नातं जास्त होते. आपल्या दोन्ही मुलींबाबत खूपच प्रोटेक्टिव्ह होत्या. खुशी आणि जान्हवी कपूरचा संभाळ करण्यासाठी त्यांनी जवळपास आपल्या करिअरमधून 15 वर्षांचा ब्रेक घेतला होता. इंग्लिश-विंग्लिश चित्रपटातून त्यांनी पुन्हा पदार्पण केले. हा चित्रपट हिट ही ठरला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच मॉम हा त्यांचा चित्रपट रिलीज झाला आहे.  आज सकाळी ९.३० वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंधेरीतल्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सकाळपासूनच याठिकाणी सेलिब्रेटी आणि चाहत्यांची आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रिघ लागली आहे.