Join us

​ ‘धडक’च्या सेटवर जान्हवी कपूर व ईशान खट्टरचा ‘कार रोमान्स’! अर्ध्या रात्री सुरु झाले शूटींग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 12:07 IST

ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘धडक’ सध्या जाम चर्चेत आहे. या चित्रपटाइतकीच जान्हवी आणि ईशान या ...

ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘धडक’ सध्या जाम चर्चेत आहे. या चित्रपटाइतकीच जान्हवी आणि ईशान या दोघांच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्याही चर्चेत आहेत. होय, ताजा किस्सा ‘धडक’च्या सेटवरचा आहे. खरे तर ‘धडक’ सुरु होण्याआधीपासून जान्हवी व ईशान या दोघांच्या लव्ह अफेअरची चर्चा आहे. दोघेही अनेकदा  मुव्ही, लंच व डिनर डेटवर एकत्र दिसले आहेत. पण आता ‘धडक’च्या सेटवर जान्हवी व ईशान   दोघेही आणखीच जवळ आले आहेत. होय, ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धडक’च्या शूटींगदरम्यान ईशान व जान्हवी दोघांना कारमध्ये इंटिमेट होतांना पाहिले गेले. दोघेही सुमारे अडीच तास कारमध्ये होते. इकडे हे लव्हबर्ड्स प्रेमात बुडाले होते आणि तिकडे सेटवरचे अख्खे युनिट त्यांच्यासाठी ताटकळत बसले होते. उण्यापुºया अडीच तासानंतर दोघेही कारबाहेर आलेत आणि यानंतर कुठे अर्ध्या रात्री शूटींग सुुरू झाले. पहाटे पाचपर्यंत शूटींग सुरू होते. मुंबई फिल्म सिटीमध्ये सुरु असलेल्या शूटींगदरम्यानची ही घटना आहे. या घटनेची सध्या बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.आई श्रीदेवी हिने खरे तर जान्हवीला ईशानपासून दूर राहण्याची ताकीद दिली आहे. पण कदाचित जान्हवीवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. ताजी घटना त्याचाच पुरावा म्हणता येईल.ALSO READ : जान्हवी कपूर अन् ईशान खट्टर झाले ‘सैराट’; दोघांनी शेअर केली एकच छत्री!‘धडक’ हा चित्रपट ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटातून जान्हवी बॉलिवूड डेब्यू करतेय. ईशानचे म्हणाल तर, ‘धडक’आधी त्याचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स व ट्रेलर रिलीज झाला आहे आणि यातील ईशानच्या अभिनयाचे बरेच कौतुक होत आहे. जान्हवीही ‘धडक’नंतर रणवीर सिंगसोबत दिसणार अशी चर्चा आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटात जान्हवी व रणवीर एकत्र दिसणार असे कळतेय. करण जोहरने ‘सिम्बा’साठी जान्हवीचे नाव सुचवल्याचेही मानले जात आहे.