जान्हवी कपूर अन् ईशान खट्टर झाले ‘सैराट’; दोघांनी शेअर केली एकच छत्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:55 IST
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या पहिल्या ‘धडक’ या चित्रपटाच्या फर्स्ट शेड्यूलकरिता उदयपूर येथे आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट ...
जान्हवी कपूर अन् ईशान खट्टर झाले ‘सैराट’; दोघांनी शेअर केली एकच छत्री!
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या पहिल्या ‘धडक’ या चित्रपटाच्या फर्स्ट शेड्यूलकरिता उदयपूर येथे आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले. ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत खूपच स्टनिंग दिसत होते. आता सेटवरून आणखी काही स्टिल पिक्स समोर आल्या आहेत. ज्यामध्ये दोघेही एक छत्री शेअर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकाच छत्रीत दोघे कम्फर्टेबल दिसत असल्याने त्यांच्यातील केमिस्ट्री चित्रपटात रंगणार असेच एकूण चित्र दिसत आहे. फोटोमध्ये ईशान फोनवर बिझी आहे, तर जान्हवी ईशानकडे बघत आहे. ईशान खट्टरचा हा दुसरा चित्रपट असून, या अगोदर त्याने ईरानी डायरेक्टर माजिद मजिदी यांच्या ‘बियोन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटात काम केले आहे. तर जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिच्या डेब्यूकडे सबंध बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दोघांना ‘धडक’ हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ६ जुलै रोजी रिलीज होणार आहे. ‘धडक’ची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत केली जात असून, शशांक खेतान त्यास दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटाविषयी सांगताना शशांक म्हणाले की, ‘धडक भलेही सैराटचा रिमेक असला तरी कथेत बराचसा बदल करण्यात आला आहे. कारण हा चित्रपट राजस्थान बेस्ड असून, अडचणींवर मात करून प्रेम करण्याची पद्धत यामध्ये दाखविण्यात येणार आहे.’ दरम्यान, मराठीतील ‘सैराट’ने बॉक्स आॅफिसवर शंभर कोटी रुपयांचा गल्ला जमविताना रेकॉर्ड निर्माण केले. हा चित्रपट गेल्यावर्षी रिलीज झाला होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा गावातील लव्हस्टोरीवर आधारित होती. चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असून, त्यातील गाणी अजूनही कानावर पडतात.