Join us

"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:09 IST

जयदीपला अहलावतला होती 'या' भूमिकेची ऑफर

दिग्दर्शक नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayan) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. दमदार व्हीएफएक्स, तगडी स्टारकास्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्टंट मास्टर अशा टीमला घेऊन हा सिनेमा बनत आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. तर साई पल्लवी मातासीतेच्या भूमिकेत आहे. साऊथ स्टार यश रावण आणि  सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. तसंच इतरही अनेक सहकलाकार आहेत. अभिनेता जयदीप अहलावतलाही (Jaideep Ahlawat) बिभीषणच्या भूमिकेसाठी ऑफर होती. मात्र त्याने ती नाकारली. यामागचं कारण त्याने नुकतंच सांगितलं.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत जयदीप अहलावतने सांगितले की, "रामायणमध्ये मला एक भूमिका ऑफर झाली होती. मात्र आमच्या तारखा  जुळून येत नव्हत्या. रावण आणि बिभीषण यांचे एकत्र सीन गरजेचे होते. मला माहितीये रावणाच्या तारखा माझ्याहून जास्त गरजेच्या होत्या. केजीएफचा  यश बहुतेक रावणाची भूमिका करतोय."

जयदीप अहलावतने गेल्या काही वर्षात अनेक दमदार सीरिज, सिनेमे दिले आहेत. 'पाताल लोक' सीरिजमधील हाथीराम चौधरीची भूमिका खूप गाजली. 'जाने जा', 'थ्री ऑफ अस','द ज्वेल थीफ' हे सिनेमे चालले. अशा टॅलेंटेड अभिनेत्याला 'रामायण' सिनेमातही पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र आता जयदीप 'रामायण' करत नसल्याचं त्याने कन्फर्म केलं आहे. 

'रामायण' कास्ट

रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल आणि यश यांच्याशिवाय सिनेमा मोठी स्टारकास्ट आहे. अरुण गोविल, रवी दुबे, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारी, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, शीबा चड्डा, इंदिरा कृष्णन यांची भूमिका आहे. 

टॅग्स :रामायणबॉलिवूड