Join us

​कॅटरिना कैफच्या जिममध्ये रिसेप्शनिस्ट बनली जान्हवी कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 12:26 IST

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. खरे तर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधीच जान्हवी स्टार बनली आहे. जान्हवीची ...

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. खरे तर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधीच जान्हवी स्टार बनली आहे. जान्हवीची बातमी नाही, अशा एकही दिवस सध्या उजाळत नाही. पण ताजी खबर तिच्या रिसेप्शनिस्ट बनण्याची आहे.  कॅटरिनाने तिच्या सोशल अकाऊंटवर जान्हवीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी फोनवर बोलताना दिसतेय. जान्हवी कुणाशी तरी फोनवर बोलतेय. कॅटरिनाने नेमकी हीच संधी हेरली आणि तिचा चोरून लपून फोटो घेतला. केवळ इतकेच नाही तर एका कॅप्शनसह तो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअरदेखील केला. ‘जान्हवीच्या रूपात आमच्या जिमला एक सुंदर रिसेप्शनिस्ट मिळाली,’ असे तिने या फोटोवर लिहिले. एकंदर काय तर या फोटोने कॅटरिनाला जान्हवीची फिरकी घेण्याची संधी दिली.ALSO READ : जान्हवी कपूरसाठी वेडा झाला हा जबरा फॅन, सोशल मीडियावर आय लव्ह यू म्हणत दिली प्रेमाची जाहीर कबूलीअलीकडे एका मुलाखतीत कॅटरिनाने जान्हवी व ईशान खट्टर या दोघांची भरभरून स्तूती केली होती. आज मी जिथे आहे, तिथून मागे बघू शकत नाही. कारण माझे वय वाढते आहे. आज ‘धडक’ सारखे सिनेमे बनत असतील तर त्यात मला घ्यावे, असा आग्रह मी करू शकत नाही. मला या अशा चित्रपटांत घेतले तरी ते गैर ठरेल, असे कॅटरिना म्हणाली होती. शिवाय हे बोलताना तिने जान्हवी व ईशानची मनापासून प्रशंसा केली होती. जान्हवी व ईशान दोघेही लाघवी आहेत. त्यांना पाहून मला मनातून आनंद होतो, असे कॅटरिना म्हणाली होती.  आता कॅटरिनाच्या या बोलण्यावरून एकच दिसते, ते म्हणजे जान्हवी व ईशान दोघांनाही एक सच्ची चाहती मिळाली आहे. जी त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती आहे.