बॉलीवूडमध्ये ज्याला आजही उत्तम डान्सर म्हणून ओळखले जाते असा चीची म्हणजेच गोविंदा याने ९० च्या दशकात धूम केली होती. आणि त्याच्यासोबत लोलो म्हणजेच करिश्मा कपूर असेल तर मग गाणे एवढे हिट व्हायचे की बस्स...! वेल, आता त्याचा संदर्भ यासाठी की, नुकतेच ‘ढिशूम’ चित्रपटातील एक गाणे ‘जानेमन आह’ रिलीज करण्यात आले आहे.
यात वरूण धवन, परिणीती चोप्रा यांनी एकदम गोविंदा-चीची यांच्याप्रमाणे अनोख्या डान्सस्टेप्ससह धमाकेदार डान्स केला आहे. यात वरूण एकदम हॅण्डसम तर परिणीती नेहमीप्रमाणेच सेक्सी, हॉट, बबली आणि सुंदर दिसत आहे.
दोघांचीही केमिस्ट्री खुपच सिझलिंग दिसत आहे. या गाण्याचा तडका पाहिल्यावर ते दोघे सध्याचे गोविंदा-करिश्माच दिसत आहेत ना!