Join us
Daily Top 2Weekly Top 5

'एक दोन तीन'मधला जॅकलिनचा फर्स्ट लूक आऊट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:54 IST

गेल्या काही वर्षांमध्ये जॅकलिनने अनेक चित्रपटात सुपरहिट रिमिक्स गाण्यावर डान्स करुन रसिकांचे मनोरंजन केले आहे. ' ज्यात 'टन टना ...

गेल्या काही वर्षांमध्ये जॅकलिनने अनेक चित्रपटात सुपरहिट रिमिक्स गाण्यावर डान्स करुन रसिकांचे मनोरंजन केले आहे. ' ज्यात 'टन टना टन' आणि 'ऊंची है बिल्डिंग' सारख्या गाण्यांचा समावेश आहे. आता या यादीत आणखीन गाणं सामील झाले आहे. जॅकलिनने 'बागी 2' मध्ये माधुरी दीक्षितच्या 'एक दोन तीन' गाण्यावर डान्स करत प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार झाली आहे. या गाण्याची कोरियोग्राफी अहमद खान यांनी केली आहे. ओरिजनल गाण्याची कोरियोग्राफी सरोज खान यांनी केली होती त्यावेळी अहमद खान हा त्यांना असिस्ट करत होता.लक्ष्मीकांत-प्यारेलालच्या संगीतावर तयार झालेल्या या गाणाला अलका याज्ञनिक यांनी गायले होते.  या गाण्यातला जॅकलिनचा पहिला लूक आऊट झाला आहे. जॅकने यात माधुरी प्रमाणे पिंक आणि येलो कलरचा ड्रेस घातला आहे. अहमद खानने याआधी जॅकलिनच्या 'चिट्टीयां कलाइयां', 'लत लग गई' या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. त्यामुळे या जोडीचे हे गाणंसुद्धा आधी प्रमाणे सुपरहिट होईल. या गाण्याबाबत बोलताना जॅकलिन म्हणाली, मी खूप नशीबवान आहे जे अहमद खान आणि साजिद नाडियाडवाला यांनी मला ही संधी दिली. हे गाणं मी माधुरी दिक्षितला माझ्याकडून ट्रिब्यूट दिले आहे. जॅकलिन फर्नांडिस सध्या रेमो डिसूझाच्या ‘रेस-३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात जॅकलिनसोबत अभिनेता सलमान खानही स्क्रिन शेअर करताना बघावयास मिळणार आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग अंतिम टप्प्यात असून, सर्व स्टारकास्ट अबूधाबीला आहे. हा चित्रपट ईदच्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यात सलमान आणि जॅकलिनसह डेजी शहा, बॉबी देओल पण दिसणार आहे. सलमान खान स्टारर ‘किक-२’मध्ये जॅकलिन पुन्हा झळकणार असल्याची चर्चा आहे. मात्र निर्मात्यांकडून अधिकृतरीत्या याबाबतची घोषणा करण्यात आली नाही.