Join us

जॅकलिन करतीय जुडवा २ ची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 15:30 IST

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही जुडवा २ ची जोरदार तयारीं करीत असून, तिच्यासोबत वरूण धवन, तापसी पन्नू यांच्याही भूमिका आहेत. ...

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही जुडवा २ ची जोरदार तयारीं करीत असून, तिच्यासोबत वरूण धवन, तापसी पन्नू यांच्याही भूमिका आहेत. यापूर्वी आलेल्या जुडवा चित्रपटातील करिष्मा कपूरची भूमिका ती करणार आहे.याबाबत जॅकलिनला विचारले असता ती म्हणाली, करिष्माने मला कोणत्याही प्रकारच्या टिप्स दिलेल्या नाहीत, परंतू मी तिचे अनेक चित्रपट पाहिलेले आहेत. ती खूपच जबदरदस्त अभिनेत्री आहे.’येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी अपेक्षा असून, वरूण धवनने दुहेरी भूमिका साकारली आहे. यापूर्वीच्या चित्रपटात सलमान खानने ही दुहेरी भूमिका साकारली होती. यात करिष्मा कपूर आणि रंभा यांच्या भूमिका होत्या. रंभाची भूमिका जुडवा २ मध्ये तापसी पन्नू ही करीत आहे. जॅकलिनने फ्लार्इंग जटमध्ये टायगर श्रॉफसोबत काम केले आहे. त्याशिवाय जॉन अब्राहमसोबत ढिशूममध्येही तिने काम केले आहे. सध्या ती आणखी एका चित्रपटात काम करते आहे. चंद्रन रत्नम यांच्या चित्रपटात तिला भूमिका मिळाली आहे.