जॅकलीनने लिसाला ठेवले ‘नो शुगर डाएट’वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:35 IST
जॅकलीन फर्नांडिस आणि लिसा हेडन या दोघी खुप चांगल्या मैत्रिणी असून ‘हाऊसफुल्ल ३’ च्या शूटिंगदरम्यान त्यांची आणखी घनिष्ठ मैत्री ...
जॅकलीनने लिसाला ठेवले ‘नो शुगर डाएट’वर
जॅकलीन फर्नांडिस आणि लिसा हेडन या दोघी खुप चांगल्या मैत्रिणी असून ‘हाऊसफुल्ल ३’ च्या शूटिंगदरम्यान त्यांची आणखी घनिष्ठ मैत्री झाली. सेक्सी जॅकलीनचे शेड्यूल कितीही बिझी असले तरीही ती तिचे जीम सेशन कधीच मिस करत नाही.ती न चुकता वर्कआऊट करते. आणि स्वत:च्या बॉडीला मेंटेन ठेवते. तर दुसरीकडे लिसाला जंक फुड खायला खुप आवडते. त्यामुळे जॅकलीनने तिला ‘नो शूगर डाएट’ वर ठेवले आहे.यावर बोलताना लिसा म्हणते, ‘ कुकीज, चिप्स, टी केक्स, चॉकलेट बार्स हे तुम्ही खाऊ शकत नाही अशी कल्पना करू शकता का? पण, जॅकलीन हे माझ्यासोबत गेल्या दोन दिवसांपासून करते आहे. पण, शूटमध्ये मी हेल्दी नाश्ता करत असते. तिचे मला मेंटेन ठेवण्यासाठीचे प्रयत्न खरंच खुप चांगले आहेत.