चिट्टीयां कल्लाइयां वे असं म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर 90 मिलियनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून ती एका नव्या पॉडकास्ट शोसाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, नेटकऱ्यांसाठी जॅकलिनची 'हरवलेली बहिण' म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री अमांडा सेर्नी या शोमध्ये जॅकलिनसोबत दिसणार आहे. अमांडाचे देखील यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 45 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असून अमांडा हॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.जॅकलिन अमांडाच्या या नव्या पॉडकास्ट व्हिडिओ शोचे नाव असणार आहे 'फील्स गुड'. ज्यामध्ये जगभरातील प्रेरणादायक बातम्या, समीक्षा आणि असणार आहेत अनपेक्षित पाहुण्यांसोबतच्या भेटीगाठी. या शोमध्ये डेटिंग, वेलनेस आणि संस्कृति यांवरच्या चर्चा असून यातील कंटेंट दर्शकांना सकारात्मकतेच्या अंगाने नेणारा असेल. हा शोची घोषणा पॉडकास्ट मंचावरील प्रसिद्ध पॉडकास्ट वनद्वारे करण्यात आली आहे.
जॅकलिन फर्नांडिस हरवलेल्या बहिणीसोबत येणार चाहत्यांच्या भेटीला, जाणून घ्या कोण आहे ही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 16:05 IST