Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जॅकलिन फर्नांडिसने मान्य केले वयाच्या चौदाव्या वर्षी तिने केले होते पहिले किस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 12:43 IST

जॅकलिन फर्नांडिसने आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. जॅकलिन आज भारतात राहात असली तरी ती मुळची श्रीलंकेची आहे. ...

जॅकलिन फर्नांडिसने आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. जॅकलिन आज भारतात राहात असली तरी ती मुळची श्रीलंकेची आहे. तिने मिस युनिव्हर्स श्रीलंका हा किताबदेखील मिळवला आहे. जॅकलिन या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी एक टिव्ही रिपोर्टर होती हे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिने अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास आणि तिच्या लहानपणीच्या आठवणी नुकत्याच एका शोमध्ये शेअर केल्या आहेत. युट्युबवर हॅनी चव्हाणने घेतलेल्या मुलाखतीत तिने तिच्या बॉलिवूड प्रवासासोबतच तिच्या पहिल्या प्रेमाविषयीदेखील सांगितले आहे. जॅकलिन ही अतिशय बबली अभिनेत्री मानली जाते. प्रत्येकाने आयुष्यात नेहमी आनंदित राहिले पाहिजे असे ती मानते. ती लहानपणापासूनच खूप मस्तीखोर आणि बडबड करणारी आहे असे तिने मुलाखतीत सांगितले आहे. जॅकलिन शाळेत असताना वर्गात सगळ्यांसोबत खूप गप्पा मारत असे. बहेरीन या अरब देशात तिचे बालपण गेले. ती शाळेत खूप ऑप्टिमेस्टिक आणि बडबडी असल्याने तिला तिच्या शाळेतील मुलांनी एक मस्त नाव ठेवले होते. शाळेतील सगळेच तिला रेडिओ बेहरिन या नावानेच हाक मारत असत असे तिने सांगितले आहे. जॅकलिनने तिच्या आयुष्यातील पहिले किस 14व्या वर्षी केले असल्याचेदेखील तिने या मुलाखतीत मान्य केले. तसेच त्या प्रियकरासोबत ती प्रेमात आकंठ बुडाली असल्याचेदेखील तिने सांगितले. त्यांचे हे नाते तीन वर्षं टिकले होते. आयुष्यात काही लोकांना किस केल्याचा तिला आज पश्चातापही होत असल्याचेदेखील तिने कबूल केले. ती शाळेत असताना अतिशय साधी असल्याने तिच्या या गोष्टीचा अनेकांनी फायदादेखील घेतला असल्याचे तिने सांगितले.