Join us

‘ऊँची हैं बिल्डिंग’साठी जॅकलिन फर्नांडिसने केली इतके तास रिहर्सल्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 10:24 IST

सन १९९७ मध्ये आलेला सलमान खान ब्लॉकबस्टर ‘जुडवा’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. सध्या ‘जुडवा’च्या सीक्वलची जोरदार तयारी सुरु ...

सन १९९७ मध्ये आलेला सलमान खान ब्लॉकबस्टर ‘जुडवा’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. सध्या ‘जुडवा’च्या सीक्वलची जोरदार तयारी सुरु आहे. या सीक्वलमध्ये वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. ‘जुडवा’मधील ‘टन टना टन’ आणि ‘ऊँची हैं बिल्डिंग’ ही दोन लोकप्रीय गाणी सीक्वलमध्ये रिक्रिएट केली जाणार आहे. आता ही गाणी सीक्वलमध्ये आहेत म्हटल्यानंतर या चित्रपटाबद्दलची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, ‘ऊँची हैं बिल्डिंग’ या एका गाण्यासाठी जॅकलिनला किती मेहनत करावी लागलीय?कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण या एका गाण्यासाठी जॅकलिनने एक दोन तास नव्हे तर  तब्बल ७० तास रिहर्सल्स केली. गाण्यातील स्टेप्स अगदी परफेक्ट याव्यात, हा जॅकचा आग्रह होता. आता जॅकची मेहनत फळास येईल, याबाबत आम्हाला तरी काहीही शंका नाही. याबद्दल जॅकलिन भरभरून बोलली.  शेड्यूल खूप थकवणारे होते. पण तरिही आम्ही खूप मस्ती केली. तुम्ही एखाद्या आयकॉनिक चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करत असाल तर थकणे हा पर्याय तुमच्याकडे नसतोच. तुमच्याकडे केवळ परफेक्ट हेच एक आॅप्शन असायला हवा. रिहर्सल्समुळे आम्हाला बरीच मदत आली. या गाण्याबद्दलच नव्हे तर या चित्रपटाबद्दल मी कमालीची उत्सूक आहे, असे जॅकलिन म्हणाली.‘ऊँची हैं बिल्डिंग’ या ओरिजनल गाण्यात गणेश आचार्य हाच कोरिओग्राफर होता. चित्रपटाच्या रिमेकमध्येही तो कोरिओग्राफर आहे. आता जॅकलिन वरूणच्या सोबतीने या गाण्याला किती न्याय देते, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा!