Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उतावळी झालीय जॅकलिन फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 11:45 IST

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे शेड्यूल खूप व्यस्त आहे. जॅकलिन आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये साजिद नाडियादवाला, साजिद खान, रेमो डिसोझासारख्या दिग्दर्शकांसोबत काम ...

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे शेड्यूल खूप व्यस्त आहे. जॅकलिन आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये साजिद नाडियादवाला, साजिद खान, रेमो डिसोझासारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. आता जॅक एका दुसऱ्या दिग्दर्शकांसोबत काम करायला उत्सुक आहे. तो दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून पद्मावत सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे संजय लीला भन्साळी आहेत. होय, तुम्ही बरोबर वाचलात जॅकलिनने नुकताच दिलेल्या एक इटंरव्हु दरम्यान सांगितले की, मी संजय लीला भन्साळी यांचा देवदास चित्रपट पाहिला आणि त्यानंतर मी त्यांची फॅन झाली आहे. ते खूपच टायलन्टेड दिग्दर्शक आहेत त्यांचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. मला त्यांच्यासोबत काम करण्याची फार इच्छा आहे. लवकरच जॅकलिन रेमोच्या ‘रेस-३’ चित्रपटात जेस्सिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात जॅकचा पोल डान्ससुद्धा करताना दिसणार आहे. डान्ससोबत जॅकलिन यात अॅक्शन करतानासुद्धा दिसणार आहे. ‘रेस-३’चे पहिले गाणे ‘हीरिए’ने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर आतापर्यंत दोन कोटी ६० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 'किक’च्या यशानंतर सलमान आणि जॅकलीन ही ब्लॉकबस्टर जोडी दुसºयांना अ‍ॅक्शन थ्रिलर करताना 'रेस 3' मध्ये दिसणार आहेत. चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.ALSO READ :  जॅकलिन फर्नांडिसने अशाप्रकारे लावले ठुमके, डान्स रिहर्सल व्हिडीओ होतोय व्हायरल!सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी यांच्या या चित्रपटाची निर्मिती टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझाने केले आहे. सलमानचा हा चित्रपट ईदनिमित्त १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जॅकलिनचा व्हिडीओ तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात असून, तिचे कौतुक केले जात आहे.