जॅकलिन फर्नांडिसने आलिया भट्टला का केले अनफॉलो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 15:43 IST
‘अ जेंटलमॅन’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फेल झाला पण यातील लीड अॅक्टर-अॅक्ट्रेस अर्थात सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस मात्र ‘हिट’ ...
जॅकलिन फर्नांडिसने आलिया भट्टला का केले अनफॉलो?
‘अ जेंटलमॅन’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फेल झाला पण यातील लीड अॅक्टर-अॅक्ट्रेस अर्थात सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस मात्र ‘हिट’ ठरले आहेत. होय, दोघांच्याही रोमान्सच्या बातम्या सध्या भलत्याच चर्चेत आहेत आणि त्यामुळे की काय, दोघेही अचानक लाइमलाईटमध्ये आलेत. एकीकडे सिद्धार्थ आणि जॅकची जवळीक आणि दुसरीकडे सिद्धार्थ व आलिया भट्ट या दोघांचे ब्रेकअप याचीही चर्चा होतेय. यापुढची ताजी बातमी म्हणजे, जॅकलिनने म्हणे इन्स्टाग्रामवर आलियाला अनफॉलो केले आहे आणि यामागे कदाचित सिद्धार्थ मल्होत्रा हे कारण आहे. जॅकलिनमुळेच आलिया व सिद्धार्थचे ब्रेकअप झाले, या बातमीला त्यामुळे बळ मिळालेय. ALSO READ : सिद्धार्थ मल्होत्रासोबत झाले ब्रेकअप; आता ‘या’ अभिनेत्याशी वाढतेयं आलिया भट्टची जवळीक !!खरे तर सिद्धार्थ आणि जॅक या दोघांनी मियामीमध्ये ‘अ जेंटलमॅन’चे शूटींग सुरू केलेत, तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याचा वास येऊ लागला होता. पण तेव्हा सिद्धार्थ आलियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. अर्थात गत वर्षभरात गोष्टी बºयाच बदलल्यात. सिद्धार्थ व जॅकच्या हॉट केमिस्ट्रीने केवळ पडद्यावरच आग लावली नाही तर रिअल लाईफमधील या दोघांची केमिस्ट्री लोकांच्याही ठसठसून डोळ्यांत भरली. पुढे आलियाने सिद्धार्थपासून ‘फारकत’ घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अ जेंटलमॅन’चे शूटींग सुरु असताना सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. शूटींग संपल्यानंतर दोघांचेही एकत्र डिनर, लाँग ड्राईव्ह असे सगळे एन्जॉय करणे सुरु असतानाच ही बातमी आलियाच्या कानावर गेली. आलियाने त्याचवेळी सिद्धार्थपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण सिद्धार्थ शूटींग संपल्यावर भारतात परत आला आणि त्याने आलियाशी पॅचअप केले. आता मात्र आलिया कायमची गेलीय. म्हणजेच जॅक व सिड यांचे क्लोजनेस वाढायला आणखी मोठी स्पेस मिळाली आहे. होय ना?