जॅकी श्रॉफला मुलगा 'टायगर' वाटतोय घोड्यासारखा; पण जॅकीदाला असे का वाटत असावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 18:43 IST
दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ त्याच्या कामावर घोड्यासारखे काम केंद्रित करतो. शुक्रवारी ...
जॅकी श्रॉफला मुलगा 'टायगर' वाटतोय घोड्यासारखा; पण जॅकीदाला असे का वाटत असावे?
दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ त्याच्या कामावर घोड्यासारखे काम केंद्रित करतो. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जॅकीदा उपस्थित होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, टायगरने तुमच्यातील कोणता गुण आत्मसात केला आहे? याचे उत्तर देताना जॅकीदाने म्हटले की, ‘टायगरची एक वेगळीच मानसिकता आहे. तो त्याच्या कामावर खूपच लक्ष केंद्रित करतो. जेव्हा तो लहान होता, तेव्हा त्याला बास्केटबॉल खेळण्याची खूप आवड होती. जेव्हा तो बास्केटबॉल खेळत होता, तेव्हा त्याचे प्रतिद्वंदी त्याचे कौतुक करीत असत. टायगरचा काही दिवसांपूर्वीच ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटात त्याच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी बघावयास मिळाला. मात्र चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता, परंतु टायगरच्या अभिनयाचे विशेषत: डान्सचे सर्वत्र कौतुक केले गेले. खरं तर गेल्या काही काळापासून टायगरला अपयशाचा सामना करावा लागत आहे. मात्र अशातही त्याला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स मिळत आहेत. कदाचित याच कारणामुळे जॅकीदाला टायगर घोड्यासारखा वाटत असावा. कारण तो त्याचे पूर्ण लक्ष केवळ त्याच्या कामावरच केंद्रित करीत असतो. जॅकीदा याविषयी पुढे बोलताना म्हणाले की, ‘टायगर जेव्हा काम करतो तेव्हा तो मला घोड्यासारखा वाटतो. कारण इकडे-तिकडे कुठेच बघत नाही. मला असे वाटते की, लोकांनीही अशाच प्रकारे आयुष्य जगायला हवे. सध्या टायगर करण जोहरच्या ‘स्टुडेंट आॅफ द इयर-२’ आणि अहमद खान याच्या ‘बागी-२’ मध्ये बिझी आहे. त्याशिवाय टायगर हॉलिवूडच्या ‘रेम्बो’ हिंदी रिमेकवरही काम करीत आहे. टायगर त्याच्या रिल लाइफबरोबरच गर्लफ्रेंड दिशा पटानी हिच्यावरूनही चांगलाच चर्चेत असतो. ही बाब पप्पा जॅकी श्रॉफ यांना माहीत असून, मुलाच्या चॉईसवर जॅकीदाला गर्व असल्याचेही त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. टायगर आणि दिशा आगामी ‘बागी-२’मधून एकत्र येत आहेत.