Join us

'त्या' रात्री जॅकी श्रॉफने केला होता तब्बूवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 15:08 IST

दृश्यमनंतर अजय देवगणसोबत गोलमाल अगेनमधून तब्बू मोठ्या पडद्यावर कमबॅक काम करण्यास सज्ज आहे. तब्बू नेहमीच आतापर्यंत निवड भूमिका स्वीकारल्या ...

दृश्यमनंतर अजय देवगणसोबत गोलमाल अगेनमधून तब्बू मोठ्या पडद्यावर कमबॅक काम करण्यास सज्ज आहे. तब्बू नेहमीच आतापर्यंत निवड भूमिका स्वीकारल्या आहेत. खूप दिवसांपासून तिला कॉमेडी चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. ती गोलमाल अगेनमधून पूर्ण झाली आहे. तब्बूचा नाव बॉलिवूडमधल्या काही अशा अभिनेत्रींमध्या सामील आहे जे क्लालिटी काम करण्यावर विश्वास ठेवतात. आज आम्ही तब्बूच्या आयुष्याशी रिलेटेड अशी एक गोष्ट सांगणार आहेत. ज्याबाबत मीडियात तर नेहमीच चर्चा झाली मात्र तब्बूने ही गोष्ट कधीच स्वीकारली नाही. हा किस्सा आहे 1986चा जेव्हा तब्बूची बहीण फराह  आणि जॅकी श्रॉफ दिलजला चित्रपटाची शूटिंग करत होते. त्यावेळी आपल्या बहिणीसोबत तब्बू नेहमी सेटवर जायची. यात डॅनी डेन्जोंगपा व्हिलनची भूमिका साकारत होता. चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर संपूर्ण स्टारकास्ट डॅनीच्या घरी पार्टी करायचे. एकेदिवशी आपल्या बहिणीसोबत या पार्टीत गेली होती. पार्टीत जॅकी श्रॉफपण उपस्थित होता. जॅकीने यावेळी नशेत होता आणि त्यांने तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट तब्बूची बहीण फरहाने सुद्धा एका इंटरव्ह्यु दरम्यान कबूल केली होती. मात्र तब्बू कधीच याबाबत काही बोलली नाही. फरहा पुढे म्हणाली की डॅनीमध्ये आला म्हणून पुढचा अनर्थ टळला. फरहाच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण बॉलिवूड आवाक् झाले होते.     ALSO READ :  'या' चित्रपटात कॅमिओ करायलाही तब्बू होती तयार, स्क्रिप्ट वाचल्याशिवाय दिला होकारयानंतर तब्बूने जॅकी श्रॉफसोबत कधीच काम केले नाही. ऐवढेच नाही तर एखाद्या अॅवॉर्डमध्ये जरी दोघे एकमेकांच्यासमोर आले तरी बोलणे टाळतात. तब्बू गोलमाल सीरिजच्या चौथ्या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगणाचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. तब्बू आणि परिणीती चोप्रा पहिल्यांदाच या सीरिजचा हिस्सा बनल्या आहेत. यानंतर पुढच्या वर्षी दसऱ्याला रिलीज होणाऱ्या अजय देवगणच्या रोमाँटिक कॉमेडी चित्रपटात ही तब्बू झळकणार आहे. यात अजय, तब्बू शिवाय अजून एक अभिनेत्री यात असणार आहे. आकिव अली याचित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे.