जॅकी चॅन नाचतोय फराहच्या तालावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 16:27 IST
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन सध्या कोरिओग्राफर फराह खान हिच्या तालावर नाचत आहे. थांबा...थांबा...असा वेगळा विचार करू नका...तालावर नाचतेयं ...
जॅकी चॅन नाचतोय फराहच्या तालावर!
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन सध्या कोरिओग्राफर फराह खान हिच्या तालावर नाचत आहे. थांबा...थांबा...असा वेगळा विचार करू नका...तालावर नाचतेयं म्हणजे, फराह जॅकीला नृत्याचे धडे देतेय. शाहरूख खान, सलमान खान यांसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना फराह आपल्या इशाºयावर नाचवते. आता जॅकीही फराहच्या इशाºयांवर नाचणार आहे.‘कुंग फू योगा’ या जॅकीच्या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोधपूर येथे सुरु आहे. या चित्रपटाला बॉलिवूडचा तडका लावण्यासाठी त्यात एक बॉलिवूडच्या धर्तीवरील गाणेही टाकण्यात आले आहे. या गाण्याची कोरिओग्राफर आहे फराह खान. कपाळावर टिळा लावलेला भारतीय वेशभूषेतील जॅकी या गाण्यावर थिरकताना दिसला. त्याची काही छायाचित्रे फराहने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिजींगमध्ये सुद्धा या गाण्याचे शूटींग होणार आहे. या चित्रपटात जॅकी चॅनसोबत सोनू सूद आणि अमायरा दस्तूर हे देखील झळकणार आहेत.