Join us
Daily Top 2Weekly Top 5

it’s a wrap : अखेर ‘बाहुबली २’चे शूटिंग संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 11:52 IST

‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ चे शूटिंग केव्हा संपणार अशी उत्सुकता प्रभासच्या चाहत्यांना लागली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांनी काल ...

‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ चे शूटिंग केव्हा संपणार अशी उत्सुकता प्रभासच्या चाहत्यांना लागली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांनी काल टिवटरवर ‘बाहुबली’चे शूटिंग संपल्याचे जाहीर करून चाहत्यांना सुखद धक्काच  दिला. ‘बाहुबली - द बिगिनिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ३ वर्ष पूर्ण झाले असून ‘बाहुबली - द कल्क्ल्युजन’ देखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘कटप्पाने बाहुबली को क्यूँ मारा’ या प्रश्नाचे उत्तर आता प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.                                                                      हाच तो सीन : ‘कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा’ या सीनसह ‘बाहुबली-द बिगिनिंग’चा शेवट झाला होता.दाक्षिणेतील ‘बिगेस्ट हिट’ बाहुबली हा विविध कारणांमुळे मध्यंतरी चर्चेत होता. कास्टिंगपासून ते सीनसिक्वेन्स शूट करण्यापर्यंत चित्रपटाचे वेगळेपण आपण पाहिले. प्रभासने देखील त्याच्या करिअरचे तब्बल ३ वर्ष सहा महिने एवढा कालावधी ‘बाहुबली’साठी दिला. ‘बाहुबली २’ रिलीज झाल्यानंतरच इतर प्रोजेक्ट्स स्विकारेन असे प्रभासने ठरवले होते. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजामौली हाच तो व्यक्ती होता ज्याला प्रभासच्या प्रयत्नांची आणि परिश्रमाची जाण होती. राजामौली यांनी टिवटरवर शेअर केले आहे की,‘साडेतीन वर्षांनंतर प्रभाससाठीही ‘रॅप अप’ झाले. एका प्रवासाचा शेवट झाला. थँक्स डार्लिंग. दुसऱ्या  कुठल्या प्रोजेक्टविषयी प्रभास एवढा भावनात्मक गुंतला नव्हता. हे माझ्यासाठी खुप महत्त्वाचं आहे.’ }}}}‘बाहुबली - द बिगिनिंग’चा शेवट कटप्पा बाहुबलीला मारतो अशावेळी दाखवण्यात आला आहे. या दुसऱ्या भागात राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना हे सर्व  मुख्य भूमिकेत दिसतील. २८ एप्रिलला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल, असे सुत्रांकडून कळतेय. या चित्रपटानंतर प्रभास सुजीत दिग्दर्शित आगामी अ‍ॅक्शन थ्रिलरच्या शूटींगवर लक्षकेंद्रित करणार आहे.