Join us

'आता खूप झालं...', सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला मिळाली रेप आणि जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 13:40 IST

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहे. आता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला रेप व जीवे मारण्याची धमकी येत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहे. आता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला रेप व जीवे मारण्याची धमकी येत आहे. यासाठी तिने सायबर क्राइमला यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

रियाने या पोस्टमध्ये लिहिले की, मला खूनी म्हटले मी गप्प बसले. पण माझी शांतता हे सांगण्याचा अधिकार कसा देते की जर मी आत्महत्या नाही केली तर तुम्ही माझ्यावर बलात्कार व हत्या कराल? तुम्ही जे म्हणाला आहात त्याचा गांभीर्याने विचार केला आहे का? हा गुन्हा आहे. मी पुन्हा सांगते की कोणाचाही अशाप्रकारे छळ करण्याचा विचार केला नाही पाहिजे. यानंतर रियाने सायबर क्राइमला या पोस्टवर मेंशन करत विनंती केली की यावर आवश्यक ती कारवाई करा. रियाने म्हटलं की आता खूप झाले.

सुशांतच्या निधनाला एक महिना झाल्यानंतर रियाने त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट शेअर करत म्हटले होते की, मी तुला विसरू शकलेले नाही. तू मला प्रेमावर विश्वास करायला शिकवले. तुझ्यामुळे मला गणित हा विषय सोपा वाटू लागला होता. तू मला रोज नव्या गोष्टी शिकवायचाय. मी तुला कधीच वेगळं करू इच्छित नव्हती. पण आता आपण कधीच भेटू शकणार नाही.

मला माहितीये, तू जिथे आहेस तिथे आनंदी आहेत. निश्चितपणे आकाशातील ताऱ्यांनी, चंद्राने, आकाशगंगेने तुझे मनापासून स्वागत केले असेल. तू माझ्यावर किती प्रेम केलेस, हे मी शब्दांत सांगूू शकत नाही. तू माझ्यावर मुक्तपणे प्रेमाचा वर्षाव केला. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, यासाठी मी प्रार्थना करेल. तू सोडून गेलास त्याला आज 30 दिवस झालेत. मी आयुष्यभर तुझ्यावर असेच प्रेम करत राहिल. आपल्या दोघांचे प्रेम असेच जिवंत राहिल आज मी वचन देते, असे रियाने लिहिले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती