‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. रोहित शेट्टी प्रॉडक्शनचा हा चित्रपट फराह खान दिग्दर्शित करणार आहे.अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर पेजवर या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘इट्स ऑफिशियल, रोहित शेट्टीने आपल्या आगामी चित्रपटासाठी फराह खानला साईन केले आहे,’असे तरणने लिहिले आहे. या चित्रपटाचे नाव, स्टारकास्ट सगळे काही अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याचीही घोषणा होईल. काही दिवसांपूर्वी रोहितने एका साऊथ चित्रपटाचे राईट्स खरेदी केलेत. हाच चित्रपट फराह दिग्दर्शित करणार असल्याची चर्चा आहे. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 13:29 IST
‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय.
IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!
ठळक मुद्देतूर्तास रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.