Join us

it's confirmed: ​‘गल्ली बॉईज’मध्ये झळकणार आलिया भट्ट अन् रणवीर सिंह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 15:18 IST

रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचे डाय हार्ट फॅन असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, रणवीर आणि आलिया दोघेही ...

रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचे डाय हार्ट फॅन असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, रणवीर आणि आलिया दोघेही लवकरच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.  या दोघांची जोडी तुम्ही जाहिरातीत पाहिलीच. जाहिरातीत एकत्र असलेल्या या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्येकजण आतूर होता. अखेर तो क्षण आलाच.या दोघांनीही प्रथमच एकत्र चित्रपट साईन केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर व आलिया ही क्यूट, हॉट आणि फे्रश जोडी झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉईज’ या चित्रपटात दिसणार आहे. रितेश शिद्वानी आणि झोयाचा भाऊ फरहान अख्तर हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. यापूर्वीही रणवीर व आलियाने झोयाचा हा चित्रपट साईन केल्याची बातमी मीडियात आली होती. पाठोपाठ डेट्स मॅच होत नसल्याने आलियाने हा चित्रपट सोडल्याचीही खबर उमटली होती. यानंतर सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान ही या चित्रपटातून रणवीरसोबत डेब्यू करणार, अशी बातमी येऊन धडकली होती. पण या सर्व बातम्या अफवा निघाल्या. आलिया व रणवीर हेच दोघे ‘गल्ली बॉईज’चे लीड फिमेल अ‍ॅण्ड मेल अ‍ॅक्टर्स असतील, हे आता पक्के झालेय. या चित्रपटात दोन हिरो असणार आहेत. यातील दुसºया हिरोची भूमिका फरहान अख्तर करणार असल्याचे कळतेय. ही कथा दोन रॅपर्सच्या खºया आयुष्यावर आधारित आहे. या रॅपर्सनी आपल्या रॅपच्या माध्यमातून मुंबईतील वाढत्या गुन्ह्यांविरोधात आवाज बुलंद केला होता. यानंतर या दोघांनीही समाजसेवेत स्वत:ला वाहून घेतले. हा झोयाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. पुढील वर्षी हा चित्रपट फ्लोरवर येणे अपेक्षित आहे. फरहान व रणवीर ही जोडी याआधी ‘दिल धडकने दो’मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली होती. आता या जोडीला चुलबुली आलियाची साथ मिळणार आहे.  इतके वाचल्यानंतर ‘गल्ली बॉईज’ तुमच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटांच्या यादीत नक्कीच सामील झाला असेल. होय ना?